शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

Corona virus :पुणे जिल्ह्यात एका दिवसात १५९८ कोरोनाबाधित; एकूण संख्या ३५ हजार ९९७

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 12:16 IST

शुक्रवारी दिवसभरात तब्बल २८ रुग्णांचा मृत्यू, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १००० वर

ठळक मुद्देजिल्ह्यात ९१६ तर पुण्यात ६०९ रुग्णांना सोडण्यात आले घरी

पुणे : पुणे जिल्ह्यात शुक्रवार (दि.१०) एका दिवसांत २८ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आता पर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांच्या मृत्यूची संख्या एक हजारा पार केली म्हणजे तब्बल १००७ वर जाऊन पोहचली आहे. तर शुक्रवारी नव्याने१५९८ कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली. पुणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात देखील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. एका दिवसांत दीड ते दोन हजारांच्या घरात रोज रुग्ण वाढत आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाला पुन्हा लाॅकडाऊन करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा हा वेग असाच राहिला थोड्याच दिवसात जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे कोरोना रुग्णांची ही साखळी तोडण्यासाठीच लाॅकडाऊन करत असल्याचे समर्थन प्रशासन करत आहे. -...............

पुुणे शहरात ९०३ कोरोनाबाधित 

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शुक्रवारी ९०३ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २६ हजार ७७ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ६०९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४४३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ९ हजार ८९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शुक्रवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ९०३ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ११, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ७३७ तर खासगी रुग्णालयांमध्ये १५५ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४४३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ७४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३६९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी १४ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८०० झाली आहे. दिवसभरात एकूण ६०९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ४२२ रुग्ण, ससूनमधील १२ तर  खासगी रुग्णालयांमधील १७५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १६ हजार १८८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ९ हजार ८९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ५२९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ५४ हजार ९४३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे ७८६ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

एकूण बाधित रूग्ण : ३५९९७पुणे शहर : २५८९२पिंपरी चिंचवड :६७७८कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ३३२७मृत्यु : १००७

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यू