Corona virus: हम होंगे कामयाब! आत्तापर्यंत एक लाख पुणेकरांनी केली कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 14:17 IST2020-09-14T20:33:38+5:302020-09-15T14:17:14+5:30
सोमवारी दिवसभरात ११०० रुग्ण वाढले; ३९ जणांचा मृत्यू

Corona virus: हम होंगे कामयाब! आत्तापर्यंत एक लाख पुणेकरांनी केली कोरोनावर मात
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असला तरी बरे होणा-यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. सोमवारी आजवर कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा एक लाखांच्या पुढे गेला. बरे झालेल्यांचा आकडा १ लाख ५३२ झाला आहे. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ८५ टक्के आहे.
सोमवारी दिवसभरात ११०० रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या १४५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९२८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १७ हजार ३९३ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९२८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४७९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४४९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार ३७२ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ३९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील २१ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ८३२ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ४५६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ५३२ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख २० हजार ७५७ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या १७ हजार ७८८ झाली आहे.
=====
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ८०७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५ लाख ३७ हजार ४५२ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.