Corona Virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार २२४ कोरोनाबाधितांची वाढ; ४१ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 19:58 IST2020-08-18T19:54:25+5:302020-08-18T19:58:18+5:30
आतापर्यंत ५९ हजार ८७४ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.

Corona Virus : पुणे शहरात मंगळवारी १ हजार २२४ कोरोनाबाधितांची वाढ; ४१ जणांचा मृत्यू
पुणे : पुणे शहरात मंगळवारी १ हजार २२४ कोरोनाबधित रूग्णांची वाढ झाली असून, १ हजार १६८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ आज ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील रहिवाशी आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायंकाळी सात वाजेपर्यंत विविध रूग्णांलयात ७६० गंभीर रूग्णांवर उपचार सुरू होते. यापैकी ४६३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर २ हजार ४७२ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत.
आजपर्यंत शहरात एकूण ७६ हजार १५७ जण कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही १४ हजार ४६९ इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ५९ हजार ८७४ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर शहरात आत्तापर्यंत १ हजार ८१४ जणांची कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
-----------------------------------
दिवसभरात विविध केंद्रांवर ५ हजार ९४७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत शहरात तपासणीचा आकडा ३ लाख ७० हजार ३९१ वर गेला आहे.