पुण्यात कोरोना संशयित रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 22:47 IST2020-05-14T22:46:52+5:302020-05-14T22:47:25+5:30
तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते..

पुण्यात कोरोना संशयित रुग्णाची हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
पुणे: बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दाखल करण्यात आले होते..मात्र गुरुवारी सायंकाळी या तरुणाने बाथरुमला जाण्याचे कारण सांगत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्मह्त्या केली. वीरेंद्र चंद्रकांत जक्कल (वय 24 रा.खडकी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात गुरुवारी (दि.१४) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात आणले होते. गुुरुवारी दुपारी तपासणीसाठी त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. तसेच कोरोना संशयित म्हणून त्याच्यावर रुग्णालयातच उपचार देखील सुरु होते. त्यात तो तणावग्रस्त असल्याचे जाणवत होते. मात्र, त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास बाथरूमला जायचे असे सांगून बाहेर पडला आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे..