शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 12:52 IST

एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा खुन केला असून याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली

बारामती : बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि ३०) सकाळी घडला. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. कोयत्याने वार करुन याचा खून करण्यात आला आहे.

एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा फरार आहे. पोलिसांनी तातडीने महाविद्यालयाचा परिसर ‘सील’ केला आहे. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खून झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी शहरातील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात रक्ताने माखलेल्या अवस्थेत आणण्यात आले. मात्र, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. पोलिसांनी तातडीने सुत्र हलवत तपास सुरु केला आहे. हा विद्यार्थी मुळचा बाहेरील तालुक्यातील असून तो शिक्षणासाठी बारामती शहरात आल्याचे समजते. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, एक महिन्यापूर्वी दुचाकीला ‘कट’ मारण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली. दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी हा खून केला आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसEducationशिक्षणStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू