शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

माळेगाव साखर कारखाना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरुन जुन्या—नव्यांमध्ये कलगीतुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 12:54 PM

दोन कारभाऱ्यांचा दावा ; कोरोना लॉकडाऊनचा वाद साखर आयुक्तांच्या कोर्टात

ठळक मुद्देअधिकृत पदभाराबाबत सभासदांना उत्सुकता

बारामती : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या पदभार स्वीकारण्यावरुन जुन्या आणि नव्या संचालक मंडळामध्ये चांगलीच जुंपली आहे.कारखान्याचा कारभार चक्क दोन चेअरमन पाहत असल्याचा ऐतिहासिक घटनाक्रम सध्या माळेगांवचे सभासद पाहत आहेत. रविवारी  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी  घेतलेला पदभार म्हणजे बेकायदेशीर घुसखोरी आहे,आपणच विद्यमान चेअरमन असल्याचा दावा रंजन तावरे यांनी केला आहे. त्यावर नवनिर्वाचित चेअरमन बाळासाहेब तावरे यांनी कायद्याच्या चाकोरीतच पदभार स्वीकारल्याचे उत्तर दिले आहे.मात्र,अधिकृत पदभाराबाबत सभासदांना उत्सुकता असल्याचे चित्र आहे.     कोरोना लॉकडाऊनमुळे उदभवलेल्या न्यायालयीन प्रक्रियेचा  वाद साखर आयुक्तांच्या कोर्टात टोलावण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळासाहेब तावरे,तानाजी कोेकरे यांनी अध्यक्ष,उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र, या दोघांनी बेकायदेशीरपणे पदभार स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपणच चेअरमन असल्याचा दावा रंजन तावरे यांनी सोमवारी कारखान्याच्या विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना केला आहे. कोरोना विषाणुजन्य परीस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे.लॉकडाऊनमुळे न्यायालयानसर्वच याचिकांवरील अंतरीम आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम केले आहेत.त्यामुळेमाळेगांव कारखान्याच्या नवनियुक्त संचालकांनी मुदत पूर्ण होईपर्यंत जुन्या संचालकांना अडथळा न आणण्याचे दिलेले आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहेत.त्यामुळे नवनिर्वाचित संचालकांना तोपर्यंत पद्भार घेण्याचा,मागण्याचा अधिकार नाही. नवनिर्वाचित संचालकांनी नवनिर्वाचितअध्यक्षांना पदभार देण्याबाबत साखर आयुक्तांचे आणलेले पत्र उच्चन्यायालयाचा अवमान करणारे असल्याचा दावा रंजन तावरे यांनी केला आहे.याबाबत चेअरमन रंजन तावरे यांनी शनिवारी(दि ४) पहाटे साखर आयुक्तांनालेखी पत्र पाठविले आहे.मात्र, अद्याप याबाबत साखर आयुक्तांनी पत्रालाकोणतेहि उत्तर दिलेले नाहि.त्यामुळे अद्याप कारखान्याच्या अध्यक्ष पदावर माझाच पदसिध्द अधिकार असल्याचा दावा रंजन तावरे यांनी केला आहे.य् ाावेळी विश्रामगृहातच पत्रकारांशी नवनिर्वाचित अध्यक्षांनी त्यांची बाजुमांडली. तर नवनिर्वाचित अध्यक्ष  बाळासाहेब तावरे यांनी रंजन तावरे यांचा दावा खोटा असल्याचे सांगत कायदेशीर रीत्या पदभार स्वीकारल्याचेपत्रकारांशी बोलताना सांगितले.रंजन तावरे यांनी हे सगळे थांबवावे.त्यांचे दावे बेकायदेशीर आहेत.कारखान्याच्या गौरवाला गालबोट लागेल, असे त्यांचे कृत्य आहे.

उच्च न्यायालय,साखर आयुक्तांच्या निर्णयानुसार हा पदभार स्वीकारल्याचे अध्यक्ष तावरे म्हणाले. कारखान्याचे संचालक योगेशजगताप म्हणाले कि, बाळासाहेब तावरे यांनी स्वीकारलेला पदभार बेकायदेशीरअसल्यास न्यायालयात दाद मागावी. सहकाराचा अनुभव असणारे ज्येष्ठ नेतेचंद्रराव तावरे यांनी आज नवनिर्वाचित अध्यक्ष तावरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीस प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहु शकतनसल्याचे लेखी पत्र दिले आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव यांनी पाठविलेले पत्र म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्षांनी त्यांनी मान्य केल्याचा पुरावाआहे.रंजन तावरे यांनी गुरुंचा अनुभवाचा मान राखावा,असा टोला संचालक जगताप यांनी लगावला आहे. यावेळी नवनिर्वाचित संचालक नितीन सातव,मदनदेवकाते,सुरेश खलाटे, अनिल तावरे आदींनी रंजन तावरे यांच्या भुमिकेवर तीव्र टीका केली.

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेAjit Pawarअजित पवारElectionनिवडणूकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस