Controversy is create due to Chairman's Chair in Old-New of Malegaon Sugar Factory | माळेगाव साखर कारखाना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरुन जुन्या—नव्यांमध्ये कलगीतुरा

माळेगाव साखर कारखाना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरुन जुन्या—नव्यांमध्ये कलगीतुरा

ठळक मुद्देअधिकृत पदभाराबाबत सभासदांना उत्सुकता

बारामती : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या पदभार स्वीकारण्यावरुन जुन्या आणि नव्या संचालक मंडळामध्ये चांगलीच जुंपली आहे.कारखान्याचा कारभार चक्क दोन चेअरमन पाहत असल्याचा ऐतिहासिक घटनाक्रम सध्या माळेगांवचे सभासद पाहत आहेत. रविवारी  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी  घेतलेला पदभार म्हणजे बेकायदेशीर घुसखोरी आहे,आपणच विद्यमान चेअरमन असल्याचा दावा रंजन तावरे यांनी केला आहे. त्यावर नवनिर्वाचित चेअरमन बाळासाहेब तावरे यांनी कायद्याच्या चाकोरीतच पदभार स्वीकारल्याचे उत्तर दिले आहे.मात्र,अधिकृत पदभाराबाबत सभासदांना उत्सुकता असल्याचे चित्र आहे.
     कोरोना लॉकडाऊनमुळे उदभवलेल्या न्यायालयीन प्रक्रियेचा  वाद साखर आयुक्तांच्या कोर्टात टोलावण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळासाहेब तावरे,तानाजी कोेकरे यांनी अध्यक्ष,उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र, या दोघांनी बेकायदेशीरपणे पदभार स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपणच चेअरमन असल्याचा दावा रंजन तावरे यांनी सोमवारी कारखान्याच्या विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना केला आहे. कोरोना विषाणुजन्य परीस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे.लॉकडाऊनमुळे न्यायालयानसर्वच याचिकांवरील अंतरीम आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम केले आहेत.त्यामुळेमाळेगांव कारखान्याच्या नवनियुक्त संचालकांनी मुदत पूर्ण होईपर्यंत जुन्या संचालकांना अडथळा न आणण्याचे दिलेले आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहेत.त्यामुळे नवनिर्वाचित संचालकांना तोपर्यंत पद्भार घेण्याचा,मागण्याचा अधिकार नाही. नवनिर्वाचित संचालकांनी नवनिर्वाचितअध्यक्षांना पदभार देण्याबाबत साखर आयुक्तांचे आणलेले पत्र उच्चन्यायालयाचा अवमान करणारे असल्याचा दावा रंजन तावरे यांनी केला आहे.याबाबत चेअरमन रंजन तावरे यांनी शनिवारी(दि ४) पहाटे साखर आयुक्तांनालेखी पत्र पाठविले आहे.मात्र, अद्याप याबाबत साखर आयुक्तांनी पत्रालाकोणतेहि उत्तर दिलेले नाहि.त्यामुळे अद्याप कारखान्याच्या अध्यक्ष पदावर माझाच पदसिध्द अधिकार असल्याचा दावा रंजन तावरे यांनी केला आहे.य् ाावेळी विश्रामगृहातच पत्रकारांशी नवनिर्वाचित अध्यक्षांनी त्यांची बाजुमांडली. तर नवनिर्वाचित अध्यक्ष  बाळासाहेब तावरे यांनी रंजन तावरे यांचा दावा खोटा असल्याचे सांगत कायदेशीर रीत्या पदभार स्वीकारल्याचेपत्रकारांशी बोलताना सांगितले.रंजन तावरे यांनी हे सगळे थांबवावे.
त्यांचे दावे बेकायदेशीर आहेत.कारखान्याच्या गौरवाला गालबोट लागेल, असे त्यांचे कृत्य आहे.

उच्च न्यायालय,साखर आयुक्तांच्या निर्णयानुसार हा पदभार स्वीकारल्याचे अध्यक्ष तावरे म्हणाले. कारखान्याचे संचालक योगेशजगताप म्हणाले कि, बाळासाहेब तावरे यांनी स्वीकारलेला पदभार बेकायदेशीरअसल्यास न्यायालयात दाद मागावी. सहकाराचा अनुभव असणारे ज्येष्ठ नेतेचंद्रराव तावरे यांनी आज नवनिर्वाचित अध्यक्ष तावरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीस प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहु शकतनसल्याचे लेखी पत्र दिले आहे. ज्येष्ठ नेते चंद्रराव यांनी पाठविलेले पत्र म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्षांनी त्यांनी मान्य केल्याचा पुरावाआहे.रंजन तावरे यांनी गुरुंचा अनुभवाचा मान राखावा,असा टोला संचालक जगताप यांनी लगावला आहे. यावेळी नवनिर्वाचित संचालक नितीन सातव,मदनदेवकाते,सुरेश खलाटे, अनिल तावरे आदींनी रंजन तावरे यांच्या भुमिकेवर तीव्र टीका केली.

Web Title: Controversy is create due to Chairman's Chair in Old-New of Malegaon Sugar Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.