चाकण- शिक्रापूर महामार्गावर कंटेनरची स्कॉर्पिओला भीषण धडक ; १ जण ठार ३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 20:10 IST2021-06-30T20:07:54+5:302021-06-30T20:10:28+5:30
दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह शिक्रापूर बाजूकडे पोबारा केला.

चाकण- शिक्रापूर महामार्गावर कंटेनरची स्कॉर्पिओला भीषण धडक ; १ जण ठार ३ जखमी
शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर शेलगाव (ता.खेड) हद्दीत भरधाव कंटेनरने समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओला धडक देऊन झालेल्या अपघातात एक ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हा अपघात मंगळवारी (दि.२९) रात्री पावणेबाराच्या सुमारास हॉटेल रसिकालगत असलेल्या आळंदी फाट्यावर घडला. किरण बारकू सातपुते (वय ३५ रा. आळंदी - देवाची ता. खेड) असे अपघातात मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे. तर स्कॉर्पिओ चालक वैजनाथ मुगावकर (वय ३४ रा. मेदनकरवाडी ता. खेड) यांच्यासह ज्ञानेश्वर आंब्रे व निलेश भोंडवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चाकण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात स्कॉर्पिओ गाडीच्या एका बाजूचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी चाकण पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पंचनामा केला. दरम्यान अपघातानंतर कंटेनर चालकाने वाहनासह शिक्रापूर बाजूकडे पोबारा केला.