शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसचा पुन्हा ‘वेट अ‍ॅड वॉच’ सस्पेन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 14:58 IST

गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार निवडीचा घोळ कायम आहे.

ठळक मुद्दे उमेदवार निर्णयाचा चेंडू राहुल गांधीच्या कोर्टातहर्षवर्धन पाटील यांच्या घरची बैठक निष्फळ 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवार निवडीचा घोळ कायम आहे. प्रतिस्पर्धी भाजपाकडून याउलट उमेदवाराची घोषणा होऊन प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे. काँग्रेसकडून उमेदवारीची माळ नेमक्या कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत कार्यकर्ते , स्थानिक नेते यांच्यात संभ्रमावस्था आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित आघाडीच्या संयुक्त बैठकीत पुण्याचा जागेची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात होती. पण या बैठकीतही निर्णय न झाल्यामुळे पुण्याच्या जागेबाबत ‘वेट अँड वॉच’ सस्पेन्स कायम राहिला आहे. 

पुण्यात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी आघाडीची संयुक्त बैठक पार पडली.यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते उल्हास पवार उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आजच्या बैठकीत पुण्याच्या जागेबाबत कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. मात्र,लवकरात लवकर दिल्लीतूनच पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल.   पाटील यांनी माहिती दिली की, लोककला कलावंत सुरेखा पुणेकर यांचे नाव काँग्रेस उमेदवारीसाठी कुठेही चर्चेत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुण्याच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराबाबत राहुल गांधी निर्णय घेतील असे सांगण्यासही ते विसरले नाही.पुण्यावर लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.अजित पवार म्हणाले की, कॉंग्रेसचा पुण्यातील उमेदवार जाहीर होण्यास वेळ लागत असला तरी जेव्हा जाहीर होईल तेव्हा त्याच जोरात काम सुरू करु. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण