पुणे जिल्ह्यातील बालेकिल्ला ढासळणार..! काँग्रेस एकनिष्ठ थोपटे घराणं भाजपच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:50 IST2025-04-17T16:49:41+5:302025-04-17T16:50:00+5:30
भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यातील बालेकिल्ला ढासळणार..! काँग्रेस एकनिष्ठ थोपटे घराणं भाजपच्या वाटेवर
पुणे :पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अधिकच्या माहितीनुसार, भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांसोबत संग्राम थोपटे यांची पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा झाली आहे. येत्या आठवड्यात मुंबईत त्यांच्या अधिकृत भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना भोर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी पक्षातील सक्रियता कमी केली होती. आता थोपटे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
कोण आहेत संग्राम थोपटे ?
संग्राम थोपटे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे पुत्र असून, भोर तालुक्यात त्यांचा ठसा आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.