महिला वक्त्यांची फौज तयार, कॉँग्रेसचा निवडणूक प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:15 AM2019-02-05T02:15:47+5:302019-02-05T02:16:15+5:30

निवडणूक प्रचारात सर्वाधिक कमी कशाची जाणवत असेल, तर ती भाषण करणाऱ्यांची.. त्यातही महिला वक्त्यांची तर वाणवाच असते. तीच कमी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून अखिल भारतीय स्तरावर करण्यात येत आहे.

congress election campaign | महिला वक्त्यांची फौज तयार, कॉँग्रेसचा निवडणूक प्रचार

महिला वक्त्यांची फौज तयार, कॉँग्रेसचा निवडणूक प्रचार

Next

पुणे - निवडणूक प्रचारात सर्वाधिक कमी कशाची जाणवत असेल, तर ती भाषण करणाऱ्यांची.. त्यातही महिला वक्त्यांची तर वाणवाच असते. तीच कमी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून अखिल भारतीय स्तरावर करण्यात येत आहे. खास दिल्लीहून प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक पाठविण्यात येत असून, त्यातून महिला वक्त्यांची फौजच तयार करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यासाठीचे असे प्रशिक्षण नुकतेच भोर येथे झाले.

अखिल भारतीय महिला काँग्रेसनेच या उपक्रमाची आखणी केली आहे. सर्व राज्यांमधील जिल्हा; तसेच शहर शाखांना अशी शिबिरे आयोजित करण्यासंबंधी आदेश दिले आहेत. प्रशिक्षक म्हणून दिल्लीहून खास मनीष तिवारी व इरफान खान यांची नियुक्ती केली आहे. भाषणाला उभे कसे राहावे इथपासून ते शब्दांवर जोर कसा द्यावा, हातांचा वापर कसा करावा, आवाज कुठे वाढवावा, कुठे कमी करावा, थांबावे कधी व कितीवेळ, श्रोत्यांना प्रश्न विचारून कसे सहभागी करून घ्यावे, असे विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी रेकॉर्डर, आरसे, छायाचित्र यांचा वापर करून चुकते कुठे, त्यात सुधारणा कशी करायची, याही गोष्टी प्रशिक्षणात सांगण्यात येतात.
पश्चिम महाराष्ट्राच्या समन्वयक संगीता तिवारी यांनी नियोजन केले. संगीता धोंडे यांनी व्यवस्था बघितली. निगार बारस्कार, वंदना सातपुते, जयश्री पाटील यांनी साह्य केले.

प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार

केंद्रातील भाजपाप्रणीत सरकारची गेल्या साडेचार वर्षांतली फसवी आश्वासने, मागील ६० वर्षांत काँग्रेसने देशउभारणीसाठी केलेले प्रयत्न, केंद्र सरकारमधील निष्प्रभ मंत्री आदी अनेक मुद्देही या महिला वक्त्यांना पुरविण्यात येत आहेत. त्यावर प्रत्येकीने कसे बोलायचे, याची तयारी करून घेण्यात येत आहे.

पुण्यातील शिबिरात उल्लेखनीय वक्तृत्व दाखविलेल्या महिलांना नंतर राज्यस्तरावरील प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. नाशिक, नगर, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अन्य मोठ्या शहरांमध्येही हे महिला वक्त्या तयार करणारे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे.

बºयापैकी भाषण करणाºया, स्टेज डेअरिंंग असणाº-या महिलांची यादी तयार करण्यास शहर व जिल्हा शाखांना सांगण्यात आले आहे. भोर येथे झालेल्या या वक्ता प्रशिक्षण शिबिरात पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथून सुमारे २०० महिला सहभागी झाल्या होत्या. सकाळी ९ वाजता आमदार संग्राम थोपटे यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद््घाटन केले. या वेळी अखिल भारतीय काँग्रेस समिती नियुक्त महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल, माजी मंत्री अनंतराव थोपटे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महासमितीच्या सचिव जेनेट डिसूझा उपस्थित होते. सोनल पटेल यांनी संकल्पना विषद केली.

महिला वक्त्यांची भाषणे प्रभावी झाली की, सभेचा रंग बदलतो. शिबिरात उत्कृष्ट ठरणाºया महिला वक्त्यांना जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरही भाषणांसाठी पाठवले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. अनंतराव, हर्षवर्धन यांची भाषणे झाली.

Web Title: congress election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.