Video: 'महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो', पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:53 IST2022-02-18T13:51:59+5:302022-02-18T13:53:56+5:30

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार गिरीष बापट यांच्या घराबाहेर "माफी मांगो" आंदोलन करण्यात आले आहे

congress agitation in pune narendra modi statement | Video: 'महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो', पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

Video: 'महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो', पुण्यात काँग्रेसचे आंदोलन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातीलकाँग्रेस पक्षाने करोना देशात पसरविला. या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात चक्क खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने  "माफी मांगो" आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या नरेंद्र मोदींचा धिक्कार असो, जोरसे बोल हल्ला बोल, अशी घोषणाबाजी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर मागावी असे कमिटीकडून यावेळी सांगण्यात आले.  

संसदेत सत्य बोलायचं असतं पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने या देशाच्या जनतेशी खोटं बोलण्याच काम करत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी त्यांनी संसदेत खोटं बोललं आहे.याचा निषेध आणि शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितलं.

Web Title: congress agitation in pune narendra modi statement