Pune:बनावट ग्राहक पाठवून खात्री; पुण्यात कॉम्प्लेक्समध्ये वेश्याव्यवसायावर छापा, २ महिलांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 20:49 IST2026-02-05T20:49:13+5:302026-02-05T20:49:46+5:30

कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावर महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून गौरी पवळे ही वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले.

Confirmed by sending fake customers Raid on prostitution in a complex in Pune, 2 women rescued | Pune:बनावट ग्राहक पाठवून खात्री; पुण्यात कॉम्प्लेक्समध्ये वेश्याव्यवसायावर छापा, २ महिलांची सुटका

Pune:बनावट ग्राहक पाठवून खात्री; पुण्यात कॉम्प्लेक्समध्ये वेश्याव्यवसायावर छापा, २ महिलांची सुटका

पुणे : उत्तमनगर परिसरातील योगीराज कॉम्प्लेक्स सरस्वतीनगर येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी, गौरी विकास पवळे (४५, रा. बधे कॉम्प्लेक्स, उत्तमनगर) हिच्याविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि. ४) ही कारवाई करण्यात आली.

सरस्वतीनगर उत्तमनगर येथील योगिराज कॉम्प्लेक्समधील पहिल्या मजल्यावर वेश्यावव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता, तेथे पीडित महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून गौरी पवळे ही वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने सापळा रचून साध्या वेश्यात छापा टाकला. ही कामगिरी पोलिस निरीक्षक छगन कापसे, पोलिस उपनिरीक्षक विशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Web Title : पुणे: नकली ग्राहक भेजकर वेश्यावृत्ति का भंडाफोड़, दो महिलाओं को बचाया गया

Web Summary : पुणे पुलिस ने उत्तम नगर में एक वेश्यालय पर छापा मारा, जिसमें दो महिलाओं को बचाया गया। गौरी पावले नाम की एक महिला को मानव तस्करी के आरोप में गिरफ्तार किया गया। यह छापा एक नकली ग्राहक द्वारा पुष्टि के बाद मारा गया।

Web Title : Pune Brothel Busted: Fake Customer Leads to Rescue of Two Women

Web Summary : Pune police raided a brothel in Uttamnagar, rescuing two women. A woman named Gauri Pawle was arrested for human trafficking. The raid followed confirmation via a decoy customer.