शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हा-तोरणा रस्त्याचे कॉँक्रिटीकरण

By admin | Updated: June 23, 2014 01:36 IST

तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाच्या कामास अखेर सुरुवात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपअभियंता व्ही. एच. पवार व कनिष्ठ अभियंता दीपक हरणे यांनी दिली.

मार्गासनी : तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाच्या कामास अखेर सुरुवात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपअभियंता व्ही. एच. पवार व कनिष्ठ अभियंता दीपक हरणे यांनी दिली.शासनाने राज्यातील किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत शासन निर्णय दि. १९-०७-२०११ नुसार किल्ले मालिका विकास प्रकल्प मंजूर केला आहे. त्यामध्ये तोरणा (प्रचंडगड) किल्ल्याचा समावेश केला आहे. या कामासाठी राज्य शासनाने पर्यटन विकास महामंडळाच्या अंतर्गत सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. वेल्हे तहसील कार्यालयापासून ते २२०० मी. लांबीचा भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असताना ते काम पायथ्यापासून सुरू करण्यासाठी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना निवेदन देऊन काही राजकीय मंडळींनी या कामास विरोध केला होता. त्यामुळे काम बंद होते. वेल्हे ग्रामपंचायतीकडून या रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे, असा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित अधिकारी व ग्रामस्थ यांची बैठक घेऊन रस्त्याचे काम किल्ल्याच्या पायथ्याकडून सुरू करावे व काँक्रिटीकरण करावे, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.नुकतेच उपअभियंता व्ही. एच. पवार व कनिष्ठ अभियंता दीपक हरणे यांनी तोरणा किल्ल्याची पाहणी केली. पुढील टप्प्यात पर्यटकांसाठी शौचालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच सुसज्ज विश्रामगृह इत्यादी गोष्टी करण्यात येणार आहेत, तर राजगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम लवकरात-लवकर सुरू करणार असल्याची माहिती उपअभियंता पवार यांनी दिली. यामुळे तालुक्यात पर्यटनास चालना मिळणार असून, युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. किल्ल्याचा रस्ता काँक्रिटीकरण व्हावा यासाठी प्रदीप मरळ, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष दत्ता देशमाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शंकर भुरूक, वेल्ह्याचे सरपंच संतोष मोरे, उपसरपंच सुनील राजीवडे, प्रकाश पवार, संदीप नगिने, सुनील भुरूक, जगन्नाथ भुरूक यांनी पाठपुरावा केला होता. (वार्ताहर)