शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

 पुण्यात नववधूची तक्रार; पती नपुंसक असल्याचे लपवून ठेवत विवाह लावून दिल्याप्रकरणी सहाजणांविरोधात गुन्हा

By किरण शिंदे | Updated: December 11, 2025 12:07 IST

तिने पती आणि सासरच्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यावरच धमक्या देण्यात आल्या, असा आरोप तिने केला आहे.

पुणेलग्नानंतरच पती नपुंसक असल्याचे समोर आल्यानंतर एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून समर्थ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहाजणांविरोधात फसवणूक, धमकी देणे आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा नपुंसक असल्याची माहिती असूनही ते लपवून ठेवत संगनमताने लग्न लावून दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी २३ वर्षीय तरुणीचे लग्न १८ एप्रिल २०२५ रोजी झाले. लग्नानंतर काही दिवसांतच पती नपुंसक असल्याचे तिला लक्षात आले. याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी तिने पती आणि सासरच्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, तिच्यावरच धमक्या देण्यात आल्या, असा आरोप तिने केला आहे.

पतीच्या नपुंसकतेबाबत कुणाला सांगितल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. शिवाय, तिचेच इतर व्यक्तीसोबत संबंध असल्याचा खोटा आरोप करून सासरकडील मंडळींनी तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. लग्नातील मानपान, वागणूक तसेच किरकोळ कारणांवरून तिच्यावर सतत मानसिक छळ केला जात असल्याचेही ती म्हणाली.

या सर्वांबरोबरच पती नपुंसक असूनही हे सत्य जाणीवपूर्वक लपवून ठेवत फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. या प्रकरणी पती, सासू, सासरे, ननंद, ननंदेचा पती आणि चुलत सासरा अशा सहाजणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  समर्थ पोलीस ठाण्याचे पथक या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Bride Files Complaint: Husband Impotent, Marriage Fraud Alleged

Web Summary : Pune: A bride filed a complaint against her husband and in-laws, alleging fraud and mental harassment. She claims they concealed the husband's impotence before the marriage. Police are investigating six individuals.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी