Raj Thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार; भावना भडकावल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 19:38 IST2023-03-23T19:36:10+5:302023-03-23T19:38:18+5:30

पिंपरी- चिंचवड येथील वाकड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारी अर्ज दाखल...

Complaint against Raj Thackeray in Wakad Police Station; Accused of inciting feelings | Raj Thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार; भावना भडकावल्याचा आरोप

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार; भावना भडकावल्याचा आरोप

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथे गुढीपाडव्यानिमित्त सभा झाली. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भावना भडकावल्याचा आरोप करीत एका मुस्लीम तरुणाने पोलिसात धाव घेतली आहे. पिंपरी- चिंचवड येथील वाकड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारी अर्ज दाखल केला आहे.

वाजीद रजाक सय्यद (रा. काळाखडक, वाकड) असे तक्रार केलेल्या तरुणाचे नाव आहे. अर्जात नमूद आहे, राज ठाकरे यांनी स्वतः ची राजकीय पोळी भाजण्यासाठी सभेचे आयोजन केले. भाषणात हिंदू-मुस्लिम समाजात भांडण होईल, असे शब्द वापरले आहेत.

Web Title: Complaint against Raj Thackeray in Wakad Police Station; Accused of inciting feelings