लुटीचा बनाव करणारा तक्रारदार अटकेत

By Admin | Updated: July 2, 2014 02:42 IST2014-07-02T02:42:59+5:302014-07-02T02:42:59+5:30

स्वत:च शिक्रापूर पोलिसांना मध्यरात्री तक्रार दाखल करून गेलेल्या एका अट्टल चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या साथीदारास शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.

The complainant detained the complainant | लुटीचा बनाव करणारा तक्रारदार अटकेत

लुटीचा बनाव करणारा तक्रारदार अटकेत

शिक्रापूर : शिक्रापूर, ता. शिरूर येथील श्री ब्रेव्हरेजेस या मिनरल वॉटर (सिटी कूल) कंपनीचे मालक अमोल येवले यांच्याकडून कच्चा माल पुरवठा करून घेतलेले एक लाख २८ हजार रुपये आपल्या गावातील मित्राला लुटायला सांगून स्वत:च शिक्रापूर पोलिसांना मध्यरात्री तक्रार दाखल करून गेलेल्या एका अट्टल चोरट्याला शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या साथीदारास शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री एक ते दीडच्या सुमारास शिक्रापूर येथील उद्योजक अमोल येवले यांच्या श्री ब्रेव्हरेजेस या कंपनीत बाटल्यांचा कच्चा माल टाकून शशिकांत नंदू जगधने (वय २५, रा. निंबळक, जि. नगर) हा एक पॅसेंजर घेऊन परत मुथ्था पॉलीमर्स (नगर) येथे चालला असताना येथील मलठण फाट्यावर एक दुचाकीस्वार आडवा आला. त्याने ड्रायव्हर जगधनेसह सहप्रवासी गोरक्ष कल्याण सरोदे (रा. निमगाव सावा) यांना मारहाण करीत गाडीतील १ लाख २८ हजारांची रोकड असलेली बॅग पळवली. ही तक्रार घेऊन जगधने शिक्रापूर पोलिसांकडे रात्री अडीच वाजता आला असता, पोलीस उपनिरीक्षक महादेव पाटील यांनी फिर्याद लिहून घेतली. या घटनेत पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, जगधने याने १ लाख २८ हजार रुपये ताब्यात घेतल्यावर लगेच दुसरा आरोपी नीलेश फंडागळे यालाही बाब कळवली. पोलिसांना खरे वाटावे म्हणून एक प्रवासी पाबळ चौकातून त्याने सोबतही घेतला व घटनेनंतर हाच साथीदार पोलिसांपुढेही सादर केला. जगधने व फंडागळे या दोघांवरही लूटमारीचा गुन्हा दाखल असून, आज शिरूर न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची कोठडी सुनावली. या तपासात वरील पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस शिपाई अमोल दांडगे, विशाल गव्हाणे, पोलीस नाईक के. के. गाडेकर, चालक बांगर लहाणू, के . पी. आव्हाड आदींनी विशेष कामगिरी करत चोरट्यांना पकडले.

Web Title: The complainant detained the complainant