शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

गेल्या वर्षीच्या तुलनेत तिळाचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 21:32 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात तिळाचे उत्पादन सुमारे ६० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिळाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलोमागे ४० ते ५० रुपयांनी दर वधारले आहेत.

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात तिळाचे उत्पादन सुमारे ६० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत तिळाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून, प्रतिकिलोमागे ४० ते ५० रुपयांनी दर वधारले आहेत. तसेच यंदा राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन कमी झाल्यास तिळाच्या दरामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा ‘तीळा’वरच संक्रात आली असल्याची भावन व्यापा-यांनी व्यक्त केली.      देशात गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत प्रामुख्याने तिळाचे उत्पादन घेतले जाते. देशांतर्गत तिळाची गरज साडेचार लाख मेट्रिक टन इतकी आहे. गेल्या वर्षी देशात तिळाचे उत्पादन ४ लाख ५० हजार मेट्रिक टन इतके होते. यंदा सुमारे १ लाख ७७ हजार मेट्रिक टन उत्पादन झाले असून मे २०१९ मध्ये बाजारात येणारे उन्हाळी तिळाचे उत्पादन साधारण ७० हजार मेट्रिक टन इतके राहण्याचा अंदाज आहे. उत्पादन घटल्याने कच्च्या तिळाच्या दरात किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी तिळाचे भाव किलोस १०० ते ११० रुपयांपर्यंत होते, अशी माहिती मार्केटयार्डातील तिळाचे व्यापारी रमेश पटेल यांनी दिली.

    जगात सुदान, युगांडा, इथोपिया, टांझानिया, नायझेरिया आदी आप्रिष्ठकन देशासह भारत, चीन, पाकिस्तान कोरिया आदी देशांत तिळाचे उत्पादन घेतले जाते. २०१७-१८ मध्ये जगभरात तिळाचे उत्पादन २१ लाख मेट्रिक टन इतके झाले होते. २०१८-१९ मध्ये त्यात वाढ होऊन २४ लाख ७७ हजार मेट्रिक टन इतके झाले आहे. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी भारतात तीळ उत्पादनात झालेली घट समोर आल्यानंतर बाजारात तिळाचे किलोचे दर १७० ते १७५ रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, जगभरातील तीळ उत्पादन वाढीची आकडेवारी जाहीर होताच तिळाच्या दरात घट होऊन ते १४० ते १५० रुपयांवर आले. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत कच्च्या तिळाच्या दरात ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, स्वच्छ तिळाचे दर किलोस १६५ ते १७० पर्यंत आहेत. तिळाचा पुरवठा कमी-जास्त झाला, तरी दरात ५ ते १० रुपयांनी वाढ होईल, असेही पटेल यांनी सांगितले.

    याबाबत अजित बोरा म्हणाले, परदेशातून भारतात तिळाची आयात केली जाते. आयात तिळावर प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. यंदा देशांतर्गत तिळाचे उत्पादन घटले आहे. उन्हाळी तिळाच्या उत्पादनाची परिस्थिती मे महिन्यात समोर येणार असली, तरी दुष्काळामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे देशांतर्गत उपलब्ध तीळ उत्पादनावरच आपली गरज भागवावी लागणार आहे. मात्र, तिळाचे दर वाढल्यास तिळाला मागणी घटून खपावर परिणाम सुरू झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीPuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड