कंपनीतील तरुणीचा मालकाकडून विनयभंग; पुण्याच्या गुरुवार पेठेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 16:25 IST2022-07-26T16:25:43+5:302022-07-26T16:25:50+5:30
मालकाने विनयभंग करून तिच्या मोबाइल क्रमांकावर अश्लील संदेश पाठविले

कंपनीतील तरुणीचा मालकाकडून विनयभंग; पुण्याच्या गुरुवार पेठेतील घटना
पुणे : खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीचा मालकानेच विनयभंग केला. ही घटना गुरुवार पेठेत घडली. याप्रकरणी कंपनी मालक बाबर जब्बार खान (वय ४२, रा. साहेर अपार्टमेंट, गुरुवार पेठ) याच्या विरोधात खडक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहितीनुसार, खान याची वातानुकूलित यंत्रणा दुरुस्ती देखभाल करणारी कंपनी आहे. तेथेच फिर्यादी काम करते. गेल्या काही महिन्यांपासून खान या तरुणीला त्रास देत होता. त्याने तिचा विनयभंग केला, तसेच तिच्या मोबाइल क्रमांकावर अश्लील संदेश पाठविले. खान याच्या त्रासामुळे तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायदा (पॉक्सो) तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कुतवळ तपास करीत आहेत.