शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

'कंपनीची संपत्ती विकून देता आले असते पैसे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 03:40 IST

डीएसके प्रकरणात सरकारी पक्षाचा युक्तिवाद; सोमवारी पुढील सुनावणी

पुणे : डीएसके यांना २०१५ ते २०१७ या काळात कंपनीची संपत्ती विकून ठेवीदार आणि बँकांचे पैसे देता येणे शक्य होते. पैसे असतानाही त्यांनी प्रकल्प पूर्ण केले नाहीत. सर्वांना पैसे परत करायचे होते तेव्हा त्यांना संधी असताना ते दिले नाहीत. संपत्ती विकली नसल्याचा युक्तिवाद करीत डीएसके प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी त्यांच्या जामिनाला विरोध केला.डी. एस. कुलकर्णी , पत्नी हेमंती आणि शिरीष कुलकर्णी यांच्या जामीन तर तन्वी कुलकर्णी, स्वरूपा कुलकर्णी आणि अश्विनी देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी झाली. सेझची जमीन नातेवाइकांच्या नावे खरेदी करून त्यासाठी डीएसकेडीएल या पब्लिक लिमिटेड कंपनीतून पैसे दिले. यात १८४ कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्यातून गुंतवणूकदार व आयकर विभागाची फसवणूक झालीे. सेबी आणि आरबीआयचे नियम लागू होऊ नये म्हणून डीएसकेंनी भागीदारी कंपन्या काढल्या. डीएसकेडीएलमधील पैसे भागीदारी कंपन्यांमध्ये वर्ग केले. बँंकांकडून ज्यासाठी पैसे घेतले ती कामे केलीच नाही. फुरसुंगीच्या जमिनीचा व्यवहार हा २००९ साली झालेला आहे. मात्र तो व्यवहार २००६ साली झाल्याचे बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. या सर्व कटात आरोपींचा सहभाग आहे, असा युक्तिवाद अ‍ॅड. चव्हाण यांनी केला. अश्विनी देशपांडे यांची या प्रकरणातील भूमिका काय होती हे दोषारोपपत्र नमूद आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. प्रसाद कुलकर्णी यांना केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.डीएसके ग्रुपने आत्तापर्यंत ५० लाख चौरस फुटाचे बांधकाम केले आहे. ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने त्यांना कोणतेही मोठी प्रलोभने दाखवली नव्हती. फायनान्स कंपन्या, बँंक आणि ठेवीदारांकडून घेतलेले पैसे ग्रुपकडून २०१७ पर्यंत नियमित परत करण्यात येत होते. या प्रकरणाचा फॉरेंसिक अहवाल देण्यात यावा, अशी सातत्याने मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप तो देण्यात आलेला नाही. पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवले म्हणून फसवणूक होत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी केला.