पुणे : छाटणीच्या नावाखाली महापौर बंगल्यातील तब्बल २१ झाडांची कत्तल करण्याचे प्रकरण महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी भवन आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून खुलासा मागवला आहे. या खुलाशानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील धोकादायक झाडे आणि धोकादायक फांद्या छाटण्याची परवानगी देण्याची जबाबदारी महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीवर असते. यासाठी संबंधित नागरिकास त्या झाडाचा किंवा फांद्यांचा फोटो महापालिकेकडे अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर, समितीकडून परवानगी दिली जाते.
मात्र, महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाचे बागकाम मिस्त्रींनी घोले रस्त्यावरील महापौर बंगल्यातील निलगिरी, पिंपळ, जांभूळ, आंबा, उंबर आणि लिंबाची अशी २१ झाडे अस्ताव्यस्त वाढली आहेत. या झाडांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी फांद्या काढणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव १२ एप्रिल रोजी शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांकडे मंजुरीसाठी ठेवला होता. साहाय्यक आयुक्तांनी लगेचच तत्परता दाखवून दि. १३ मार्चला हा प्रस्ताव मंजूर करून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले, त्यानुसार, वृक्षसंवर्धन विभागाने दोन दिवसांपूर्वी फांद्या छाटणीच्या २१ झाडांची कत्तल केली.
मात्र, प्रत्यक्षात फांद्या छाटणीच्या नावाखाली अनेक झाडे दहा फुटांपर्यंत कापून टाकली आहेत. काही झाडे बुंध्यापासून कापली आहेत. खोटी माहितीच्या टोलवाटोलवीमुळे या प्रकरणातील गोंधळ आणि विसंगतीसमोर आल्यानंतर आयुक्त नवल किशोर राम यांनी कडक पवित्रा घेतला आहे. उद्यान विभाग, क्षेत्रीय कार्यालय आणि भवन विभाग या तिन्ही विभागांकडून या प्रकरणाचा सविस्तर खुलासा मागवण्यात आला आहे. प्रशासकीय प्रक्रियेत कोठे चूक झाली आणि चुकीची माहिती का दिली गेली, याचा शोध आता घेतला जात आहे.
उद्यान विभाग, क्षेत्रीय कार्यालय आणि भवन विभागाकडून या प्रकरणाचा खुलासा मागवण्यात आला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. - नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका.
Web Summary : Pune's Municipal Commissioner investigates the felling of 21 trees at the Mayor's bungalow under the guise of pruning. An explanation has been demanded from the building and regional office. Action will be taken against those found guilty after the investigation.
Web Summary : पुणे नगर निगम आयुक्त ने महापौर बंगले में छंटाई के नाम पर 21 पेड़ों की कटाई की जांच शुरू की है। भवन और क्षेत्रीय कार्यालय से स्पष्टीकरण मांगा गया है। जांच के बाद दोषियों के खिलाफ कार्रवाई की जाएगी।