शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Jayanti 2026: सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे; पुण्यात शिवजयंतीच्या सोहळ्याला ९६ स्वराज्यरथांची मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:23 IST

सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ, विविध पथकातील रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, ढोल-ताशा पथकाचा रणगजर अशा उत्साही वातावरणात मिरवणुकीला सुरुवात होते

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती गुरुवारी, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लालमहाल येथून “शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा” या भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीचे यंदा सलग १४ वे वर्ष आहे. सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ९६ स्वराज्यरथांचा सहभाग हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे संकल्पक आणि समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

दरवर्षी जिजाऊ-शहाजी शिवज्योत रथ एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ९६ स्वराज्यरथ, विविध पथकातील रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना, ढोल-ताशा पथकाचा रणगजर अशा उत्साही वातावरणात मिरवणुकीला सुरुवात होते.  या मिरवणुकीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ, पुणे महापौर मंजूषा नागपुरे, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पिंपरी चिंचवड महापौर रवी लांडगे, पोलिस उपायुक्त परिमंडळ १ कृषीकेश रावल, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शंकर मांडेकर तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सुनील रासने, ज्येष्ठ विधिज्ञ प्रताप परदेशी उपस्थित राहतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Jayanti Pune: 96 'Swarajya' Chariots to Honor Great Warriors

Web Summary : Pune's Shiv Jayanti will feature a grand procession on February 19, 2026, showcasing 96 'Swarajya' chariots honoring great Maratha warriors and leaders. The event includes martial arts displays and drum performances, with inauguration by prominent figures.
टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंतीSocialसामाजिकChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिस