Pune Crime: 'ते' पुण्यात विमानाने यायचे, चोऱ्या करायचे अन् परत विमानाने जायचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 15:41 IST2021-12-23T15:36:28+5:302021-12-23T15:41:55+5:30
पुणे शहरात सातत्याने घरफोड्या रोखण्यासाठी पोलीस माहिती घेत होते..!

Pune Crime: 'ते' पुण्यात विमानाने यायचे, चोऱ्या करायचे अन् परत विमानाने जायचे
पुणे:पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 4 च्या कर्मचाऱ्यांनी दोन आतंरराज्य चोरट्यांना अटक केली. हे चोरटे उत्तरप्रदेशातून चोरी करण्यासाठी विमानाने पुणे शहरात यायचे. चोरी झाल्यानंतर त्यातील एक जण चोरीचा मुद्देमाल घेऊन ट्रॅव्हल्सने जायचा. तर इतर सर्व विमानाने उत्तर प्रदेशात परत जायचे. परवेज शेर मोहम्मद खान (वय 43) आणि तस्लिम अरीफ समशूल खान (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात सातत्याने घरफोड्या रोखण्यासाठी शाखेचे पोलीस माहिती घेत होते. यादरम्यान त्यांना आंतरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगार रेकी करून घरफोडीचे गुन्हे करत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यातील दोन चोरटे लोहगाव येथे थांबले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी केल्याचे कबूल केले. या चोरीतील 130 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार आहे. चोरी करण्यासाठी ते उत्तर प्रदेशातून पुण्यात विमानाने यायचे. चोरी केल्यानंतर एक जण बसने मुद्देमाल घेऊन जायचा तर दुसरा परत विमानाने जायचा. यातील दोघांवरही यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत.