शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरुन महाविद्यालयीन तरुणाचा खुन

By admin | Updated: March 28, 2017 18:55 IST

किरकोळ कारणावरुन झालेल्या बाचाबाची दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा खुन करण्यात आला़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २४ तासात दोघांना अटक केली आहे़

दोघा मित्रांना अटक : सिंहगड कॉलेज कॅम्पसमधील घटनापुणे : किरकोळ कारणावरुन झालेल्या बाचाबाची दोघा जणांनी केलेल्या मारहाणीत महाविद्यालयीन तरुणाचा खुन करण्यात आला़ याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी २४ तासात दोघांना अटक केली आहे़ आशिष विभिषण पवार (वय २०, रा़ आसावरी, नांदेड सिटी) आणि आकाश अनिलकुमार डोके (वय २०, रा़ दामोदरनगर, हिंगणे खुर्द) अशी अटक केलेल्या महाविद्यालयीन तरुणांची नावे आहेत़गौरव रामचंद्र जाधव (वय २१, रा़ सिंहगड इन्स्टिटयुट हॉस्टेल, आंबेगाव बुद्रुक, मुळ घुरसाळे, ता़ खटाव, जि़ सातारा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे़ याप्रकरात मनोज सुभाषचंद्र चोरडिया (वय २४, रा़ नवले पुलाजवळ) आणि अभिजित शिंदे हे जखमी झाले असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़ ही घटना सिंहगड कॉलेज कॅम्पसमध्ये २६ मार्च रोजी रात्री ११ वाजता घडली़ याप्रकरणी अभिजित प्रभाकरराव शिंदे (वय २२, रा़ मधुकोश बिल्डिंग, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे़ यातील सर्व जण सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असून ते वेगवेगळ्या पदव्यांचे शिक्षण घेत आहेत़ गौरव जाधव, मनोज चोरडिया हे शुभम चौधरी या मित्रांचा वाढदिवस साजरा करुन रात्री कॉलेजच्या कॅम्पसमधील एव्हिकेशन कॉलेजजवळच्या पायऱ्यावर बसले होते़ आशिष पवार, आकाश डोके हे आंबेगाव येथील जत्रेला जाऊन तेथे आले़ ते गप्पा मारत बसले असताना एकाने त्यांची ओळख करुन दिली़ तेव्हा गौरव जाधव याने ओळख दाखविली नाही़ त्यावरुन त्याच्यात व आशिष पवार याच्यात बाचाबाची व शिवीगाळ झाली़ तेव्हा आभिजित शिंदे यांचा मित्र आकाश कराडकर याने दोघांची समजूत घालून त्यांना तेथून पाठविले़ मात्र, या बाचाबाचीचा राग मनात धरुन आकाश डोके हातात बांबु घेऊन आला व त्याने गौरव जाधव याच्या पायावर, डोक्यात बांबुने मारहाण केली़ आशिष पवार याने मनोज चोरडिया यालाही बांबुने मारहाण केली़ ते पाहून शिंदे हे पळत जाऊन मदतीसाठी आकाश कराडकर याला बोलवून घेऊन आला़ तेव्हा पवार याने कराडकर यालाही बांबुने मारहाण केली़ त्यानंतर ते पळून गेले़ तिघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना सोमवारी रात्री गौरव जाधव याचा मृत्यु झाला़ भारती विद्यापीठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला़ या दोघांचा शोध घेत असताना ते मुळगावी पळून जाण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारापाशी थांबले असल्याची माहिती मंगळवारी सकाळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांना मिळाली़ तेथे जाऊन पोलिसांनी दोघांना तातडीने अटक केली़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, श्रीकांत शिंदे, तपास पथकाचे उपनिरीक्षक समाधान कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपींना पकडण्यात यश मिळविले. न्यायालयाने दोघांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़