दुचाकी घसरून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू;सहप्रवासी तरुण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:01 IST2025-06-04T17:59:58+5:302025-06-04T18:01:19+5:30
ते दोघे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास एसएनडीटी महाविद्यालयाजवळील कॅनाॅल रस्त्याने निघाले होते. विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील आठवले चौकात त्यांची दुचाकी घसरली.

दुचाकी घसरून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू;सहप्रवासी तरुण जखमी
पुणे : भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाजवळ घडली. या अपघातामध्ये दुचाकीवरील सहप्रवासी जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तन्मय सचिन कळंत्रे (वय २१, रा. कोथरूड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर सेतू सुरेंद्र सुरकार (वय २०) असे अपघातामध्ये जखमी झालेल्या सहप्रवाशाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तन्मय आणि सेतू हे शिवाजीनगर भागातील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होते. ते दोघे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास एसएनडीटी महाविद्यालयाजवळील कॅनाॅल रस्त्याने निघाले होते. विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील आठवले चौकात त्यांची दुचाकी घसरली. या अपघातामध्ये दोघे जखमी झाले. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तन्मयचा मृत्यू झाला. याबाबत सहायक फौजदार विजय डेंगळे यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले तपास करीत आहेत.