शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडले; नऱ्हे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 12:09 IST

तरुणीचा जागीच मृत्यू; टँकर चालकाला अटक 

धायरी : मैत्रिणी बरोबर दुचाकीवरून कॉलेजला निघालेल्या विद्यार्थिनीला पाण्याच्या टँकरने चिरडले. या झालेल्या अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रस्त्यावर घडली. साक्षी आप्पा बाटे (वय१९, रा. बी, समर्थ नगर, गणेश नगर, धायरीपुणे) असे या अपघातात मृत्यु झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

याबाबत तिची मैत्रीण रागिणी बालाजी कंकुले (वय १९, किरकटवाडी, पुणे) यांनी टँकरचालकाविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून टँकर चालक सुदाम सोमा जाधव (वय:५० वर्षे, रा. धायरी, पुणे मूळ: यवतमाळ) यांस सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. 

सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी ही तिची मैत्रिण रागिणी बालाजी कंकुलेबरोबर दुचाकीवरून नऱ्हे येथील धायरेश्वर नर्सिंग कॉलेजला जात होती. अभिनव कॉलेज रस्त्याने जात असताना पाण्याचा टँकर( एमएच.१२,एचडी.४०९१) हा दुचाकीच्या पुढे चालला होता. टँकर चालकाने ब्रेक दाबल्याने दुचाकीवरील या दोघी जणी खाली पडल्या. दरम्यान दुचाकीवर पाठीमागे बसलेली साक्षी ही टँकरच्या मागे खाली पडली. त्याचवेळेस पुढे चढ असल्याने टँकर हा थोडा पाठीमागे आला, दरम्यान टँकरचे पाठीमागचे चाक साक्षीच्या डोक्यावरून गेले. यामुळे साक्षी ही या अपघातात जागीच ठार झाली.तर रागिणी कुंकुले किरकोळ जखमी झाली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.

.........मनमिळाऊ साक्षी; धायरी परिसरात हळहळ व्यक्तसाक्षी हिचे वडील आप्पा बाटे यांचा धायरी येथील गणेशनगर परिसरात टेलरिंगचा व्यवसाय आहे. त्यांना एक मुलगा व मुलगी साक्षी असा परिवार होता. साक्षी ही नऱ्हे येथील धायरेश्र्वर नर्सिंग कॉलेजला शिकत होती. मात्र मनमिळावू असणाऱ्या साक्षीच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच धायरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  ..... 

बेदरकारपणे वाहने चालवितात चालक ; कारवाई करण्याची मागणीनऱ्हे - धायरी परिसरात सध्या उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई जाणवत आहे. प्रत्येक सोसायटीला टँकर द्वारे पाणी पुरविले जाते. मात्र बऱ्याच वेळेला दिवसांत टँकरच्या जास्त खेपा व्हाव्या, म्हणून टँकर चालक बेदरकारपणे वाहन चालवितात. यातील बऱ्याच वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेटही नसते. अशा वाहनांवर आरटीओने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेDhayariधायरीDeathमृत्यूAccidentअपघातPoliceपोलिस