शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

Health News: सकाळी थंडी अन् रात्री उकाडा; सर्वसामान्यांच्या आरोग्यवर होतायेत दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 13:16 IST

कणकणी येणे, ताप येणे, खाेकला येणे, अंगदुखी, डाेकेदुखी, घसादुखी या लक्षणांनी नागरिक हैराण

पुणे : रात्रीच्या वेळी उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवताे, तर सकाळच्या वेळी स्वेटर घातल्याशिवाय बाहेर पडू नये इतकी अंगाला झाेंबणारी थंडी असते. या बदलणाऱ्या वातावरणाचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. तापमानात अचानक होणाऱ्या परस्परविराेधी फरकामुळे वातावरणात विषाणूंची संख्या वाढत आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशा विषाणूजन्य आजारांनी (व्हायरल फीव्हर) लहानांपासून माेठे बेजार झाले आहेत.

या आठवड्यात शहरातील तापमान सारखे बदलत आहे. तापमानात होणारा तीव्र चढ-उतार यामुळे वातावरण बदललेले आहे. जेव्हा असे परस्परविराेधी हवामान बदलते, तेव्हा वातावरणात विषाणू, जिवाणूंची संख्या वाढते. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी असलेले लहान व माेठे व्यक्ती आजारी पडतात. यामध्ये कणकणी येणे, ताप येणे, खाेकला येणे, अंगदुखी, डाेकेदुखी, घसादुखी या लक्षणांनी नागरिक हैराण झाले आहेत. तसेच उपचारासाठी ते सरकारी रुग्णालये, तसेच खासगी दवाखान्यांतही गर्दी करत आहेत.

शहरात भागानुसारही तापमानात तफावत

पुणे शहरात व उपनगरांत वेगवेगळ्या ठिकाणी तापमानाची प्रचंड तफावत जाणवत आहे. शिवाजीनगर आणि हडपसर या दाेन्हीमधील तापमानातही खूप फरक आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी शिवाजीनगरचे किमान तापमान अवघे ११.५ अंश सेल्सिअस हाेते. त्याच वेळी हडपसरचे १९.५ अंश सेल्सिअस नाेंदवले गेले. तर लवळेला २२.५ इतके तापमान नाेंदवले गेले. याच ठिकाणांवरील शनिवारी दुपारचे कमाल तापमान हे शिवाजीनगर ३३.८ अंश सेल्सिअस, हडपसर ३५.३ आणि लवळे ३७.७ इतके नाेंदवले गेले. याचाच परिणाम आजारी पडण्यावर हाेताे.

मास्क वापरा

मास्क हा अनेक आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त आहे. व्हायरल फीव्हर असलेली व्यक्ती मास्क वापरत असेल तर आजाराचा प्रसार रोखण्यासाठी उपयुक्त आहे. आजारी व्यक्तीच्या तोंडावाटे संसर्ग हाेण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे.

काय काळजी घ्याल?

- ज्यांना आधीच श्वसननलिकेच्या संसर्गाचा त्रास आहे, त्यांनी डाॅक्टरांना दाखवावे.- ज्यांना याबाबतची आधीच औषधे सुरू आहेत, त्यांनीही त्या औषधांमध्ये काही बदल करायचे असतील, तर डाॅक्टरांच्या सल्ल्याने करून घ्यावेत.- मास्कचा वापर करावा.- भाज्या, फळे धुऊन घ्याव्यात. पाणी उकळून पिणे, मास्क वापरणे, गर्दीत जाणे टाळणे, बाहेरचे खाणे टाळावे.- त्वचेच्या समस्यांसाठी त्वचाविकार तज्ज्ञांना दाखवा.- त्वचेसाठी याेग्य ते मॉइश्चरायझरचा वापर करावा.- ड्रायनेसचा परिणाम पचनावर हाेताे, त्यासाठी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवायला हवे.

त्वचेच्या समस्यांचे प्रमाण वाढले

बदललेल्या हवामानामुळे रुग्णांमध्ये अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे. याला कुठलाही वयाेगट अपवाद नाही. त्यामध्ये धूर, धूळ, वायुप्रदूषण भर घालत आहे. ज्यांना रेस्पिरेटरी सिंड्राेम जसे दमा, न्युमाेनिया, ब्राँकायटिस आहे, त्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. हवामानातील बदलामुळे वातावरणात ‘व्हायरल लोड’ वाढलेला आहे. त्यामुळे साधा खोकला, सर्दी यासह न्युमोनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे त्वचेच्या समस्यांचे प्रमाण वाढले आहे. त्वचा काेरडी पडते, असेही दिसून येत आहे. - डॉ.भारत कदम, कार्यकारी सदस्य, पुणे डॉक्टर असोसिएशन.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यTemperatureतापमानSocialसामाजिकMaharashtraमहाराष्ट्र