शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय साहित्य खरेदीचा पुन्हा गोंधळ

By admin | Updated: April 12, 2015 00:28 IST

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेश मुदतीत देण्यासाठी, या खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्याचे अधिकार स्थायी समितीने नुकतेच महापालिका प्रशासनास दिले होते.

पुणे : महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि गणवेश मुदतीत देण्यासाठी, या खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्याचे अधिकार स्थायी समितीने नुकतेच महापालिका प्रशासनास दिले होते. या निर्णयास अवघा महिनाभराचा कालावधी लोटला असतानाच शुक्रवारी पुन्हा मंडळाला सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे ही साहित्य खरेदी कोण करणार, असा पेच महापालिका प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. या वादामुळे पुन्हा एकदा शालेय साहित्य वेळेत मिळणार का, याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षण मंडळाचा कारभार मागील वर्षापासून महापालिका प्रशासनाकडे आलेला आहे. त्यामुळे या पुढे शालेय साहित्यात असलेले दप्तर, वह्या, गणवेश, स्वेटर, शिष्यवृत्तीची पुस्तके महापालिकेकडून देण्यात येतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ही खरेदी वेळत होत नाही. चढ्या दराने खरेदी, निविदा प्रक्रियेत गोंधळ यामुळे उशीर होतो. त्यामुळे पहिले सत्र संपल्यानंतर वह्या, उन्हाळ्यात स्वेटर, शिष्यवृत्तीची पुस्तके परीक्षा तोंडावर आल्यानंतर, तर गणवेश शेवटच्या सत्रात मिळतो. यामुळे महापालिका प्रशासनाकडून यंदा आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ मार्चला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या साहित्य खरेदीच्या निविदा प्रक्रिया राबविण्याÞचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.त्यास समितीने एकमताने मान्यता दिली होती. या निर्णयानुसार, प्रशासनास केवळ निविदा प्रक्रिया राबविता येईल. त्यानंतर खरेदी बाबतचा अंतिम निर्णय महापालिका प्रशासन घेणार होते. मात्र, आता महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार, सर्व प्रकारचे अधिकार शिक्षण मंडळास दिले आहेत. यामध्ये शालेय साहित्य खरेदीचेही अधिकार असणार आहेत. त्यामुळे एकीकडे स्थायी समितीने प्रशासनास निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे, तर दुसरीकडे मंंडळास आयुक्तांनी अधिकार दिले आहेत. त्यामुळे खरेदी नेमकी करणार कोण, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर, या वर्षी शिक्षण मंडळाचे वेगळे अंदाजपत्रक नसल्याने या गोंधळात आणखीनच भर पडणार आहे. त्यातच महापालिका प्रशासनास खरेदीबाबत अधिकार दिल्याने त्यांनी महिनाभरापासून ही प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारी अधिकार मिळताच, येत्या गुरुवारी( दि.१६) रोजी मंडळाने खरेदीसाठी बैठकीही बोलाविली आहे. त्यामुळे खरेदीबाबतचा संभ्रम वाढला आहे.शिक्षण मंडळाला अधिकार देण्यावरून अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे कोणते अधिकार द्यायचे, हा मुख्य सभेचा विषय आहे. त्यानुसार मुख्य सभा काय निर्णय घेणार, यावरच आर्थिक अधिकार ठरतील. या वर्षी मंडळाचे स्वतंत्र अंदाजपत्रक नाही. या निधीचा ‘स्थायी’च्या अंदाजपत्रकामध्येच समावेश आहे. त्यामुळे याबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य सभा काय निर्णय घेते, हे पाहणे सयुक्तिक ठरेल.- अश्विनी कदम, स्थायी समिती अध्यक्ष.पूर्वीप्रमाणेच अधिकार द्यावेत, असे शासनाचे आदेश आहेत. आयुक्तांनीही त्याप्रमाणेच पत्र दिले आहे. त्यानुसार आम्ही १६ तारखेपासून खरेदी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करणार आहोत. आर्थिक अधिकार ‘स्थायी’ला दिले, तरी खरेदी प्रक्रियेसाठी जाहिरात, स्पेसीफिकेशन, प्रस्ताव, ई-निविदा आम्हीच राबविणार आहोत. आम्हाला देण्यात आलेल्या अधिकारात खर्चाच्या अधिकाराचाही समावेश आहे.- बाबा धुमाळ, शिक्षण मंडळ अध्यक्ष.