शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कात्रज प्राणी संग्रहालयासह पुण्यातील ४५० उद्याने बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 4:16 PM

खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर प्रतिबंध

ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या हद्दीतील उद्यानांमध्ये येतात नागरिक मोठ्या संख्येनेउद्यानाच्या गेटवर अशा आशयाचे फलक लावण्यात येणारउद्यानांमधील दैनंदिन स्वच्छता विषयक कामे मात्र सुरु राहणार

पुणे : राज्यात कोरोनाचे जेवढे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर प्रतिबंध लावले आहेत. महापालिकेनेही सार्वजनिक उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून पालिकेच्या ४५० उद्यानांसह कात्रजचे प्राणी संग्रहालयसुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल यांनी काढले आहेत.   राज्य सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंबंधीचे निर्देश दिलेले असून यात्रा/समारंभ/उत्सव/इत्यादीसह मोठा जनसमुदाय एकत्रित येईल अशा कार्यक्रमांनाही प्रतिबंध करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील उद्यानांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने येतात. दररोज सकाळी फिरायला जाण्यापासून रात्री उशिरापर्यंत या बागा गजबजलेल्या असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण उद्यानांमध्ये येत असतात.उद्यानात येणाऱ्या नागरिकांना एकमेकांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी सर्व उद्याने व राजीव गांधी प्राणीसंग्रहालय, नागरिकांसाठी पुढील आदेश होईपर्यंत पूर्ण वेळ बंद ठेवण्यात यावीत असे आदेश देण्यात आले आहेत. उद्यानाच्या गेटवर अशा आशयाचे फलक लावण्यात येणार असून उद्यानांमधील दैनंदिन स्वच्छता विषयक कामे मात्र सुरु राहणार आहेत. ..................

टॅग्स :Puneपुणेkatraj zoo parkकात्रज प्राणीसंग्रहालयPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका