शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

साह्यकडा ॲडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी नवरी सुळका केला सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST

माहुलीगड, पळसदुर्ग आणी भंडारदुर्ग या दुर्ग त्रिकुटाला एकूण १८ सुळके आहेत. भंडारदुर्ग आणि चंदेरी डोंगर यांच्यामधील खिंडीत नवऱ्याची करवली, ...

माहुलीगड, पळसदुर्ग आणी भंडारदुर्ग या दुर्ग त्रिकुटाला एकूण १८ सुळके आहेत. भंडारदुर्ग आणि चंदेरी डोंगर यांच्यामधील खिंडीत नवऱ्याची करवली, भटोबा, नवरी, नवरीची करवली आणि बाण हे एका पेक्षा एक आरोहणास कठीण असणारे सुळके आहेत. यातील नवरी सुळका आरोहण करण्याचे आव्हान साह्यकडाच्या गिर्यारोहकांनी उचलले. माहुलीगड आणि तेथील अवघड वाटांची माहिती असलेले गाईड रघुनाथ कृष्णा आगिवले यांच्यासोबत जंगलातील खडतर वाटेने भारंगी नदी ओलांडून चंदेरीच्या धारेवरून खिंडीच्या खाली असलेल्या एका छोट्याशा सपाटीवर पोहोचली.

प्रारंभी विधिवत श्रीफळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर लीड क्लाइंबर श्रीराम पवळे यांनी सुळक्यावर चढाई चालू केली त्यास अनुभवी गिर्यारोहक बाबाजी चौधरी हे बिलेअर होते.

सावधगिरी बाळगून रोप फिक्स करत श्रीरामने ते आवाहन लीलया पार केले. त्यानंतर किरण पोतले, राहुल खोराटे, सचिन पाटील, सागर मांडेकर, तलाठी भाऊसाहेब पवनकुमार शिवले, आदेश चौधरी, निखिल पोखरकर,‌ ॲड. किरण दौंडकर, विलास कुमकर, १४ वर्षीय बाल गिर्यारोहक विक्रांत चौधरी, महिला गिर्यारोहक श्रुतिका खांदवे आणि प्रगती चौधरी यांनी झुमरिंग करत सुळक्याचा माथा गाठला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषात तिरंगा फडकविण्यात आला.

३१ शेलपिंपळगाव सुळका

माहुली गडालगतचा नवरी सुळका यशस्वीपणे सर केल्यानंतर जल्लोष करताना गिऱ्हारोहक.