कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

By किरण शिंदे | Updated: February 13, 2026 12:13 IST2026-02-13T12:13:01+5:302026-02-13T12:13:25+5:30

एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकाला बँकॉकवरून येणाऱ्या विमानातून अंमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती

Cleverly hidden in carbon paper; Drugs worth Rs 5.5 crore seized from Pune airport, one arrested | कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एअर इंटेलिजन्स युनिटने ही कारवाई केली. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून तब्बल ५४२९ ग्रॅम हायड्रोपोनिक वीड (मारिजुआना) जप्त केली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकाला एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-241 या विमानाने बँकॉकवरून येणाऱ्या विमानातून अंमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार ११ फेब्रुवारी रोजी पुणे विमानतळावर हे विमान पुण्यात दाखल होताच संबंधित प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बॅगेची तपासणी केली असता हे अमली पदार्थ सापडले.

या प्रवाशाच्या बॅगेत पाच खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेले पॅकेट्स आढळले. हे पॅकेट्स कार्बन पेपरमध्ये गुंडाळून अत्यंत चलाखीने लपवण्यात आले होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे हा प्रयत्न फसला. तपासात या पॅकेट्समध्ये उच्च प्रतीची हायड्रोपोनिक पद्धतीने तयार केलेली मारिजुआना असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित प्रवाशाला नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Web Title : पुणे हवाई अड्डा: 5.5 करोड़ रुपये के ड्रग्स जब्त, एक गिरफ्तार

Web Summary : पुणे हवाई अड्डे पर बैंकॉक से आए एक यात्री से 5.5 करोड़ रुपये की हाइड्रोपोनिक वीड जब्त की गई। कार्बन पेपर से ढके खिलौना बक्सों में छिपे ड्रग्स एयर इंटेलिजेंस यूनिट ने खोजे। यात्री को एनडीपीएस एक्ट के तहत गिरफ्तार किया गया है।

Web Title : Pune Airport: Drugs Worth ₹5.5 Crore Seized, One Arrested

Web Summary : ₹5.5 crore worth of hydroponic weed seized at Pune Airport from a Bangkok passenger. The drugs, hidden in carbon paper-lined toy boxes, were discovered by Air Intelligence Unit. The passenger has been arrested under the NDPS Act.