बिबट्याची शिकार करून नखं, पंजा फार्महाउसच्या कपाटात; उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल

By प्रशांत बिडवे | Published: August 21, 2023 07:50 PM2023-08-21T19:50:28+5:302023-08-21T19:50:51+5:30

बिबट्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

Claws and Claws in Farmhouse Closets by Hunting Leopards A case has been registered against entrepreneurs | बिबट्याची शिकार करून नखं, पंजा फार्महाउसच्या कपाटात; उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल

बिबट्याची शिकार करून नखं, पंजा फार्महाउसच्या कपाटात; उद्योजकांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : बिबट्याची शिकार करून अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वन विभागाने छापा टाकून बिबट्याच्या नखांसह पंजा जप्त केला आहे. याप्रकरणी दाेन उद्याेजकांविराेधात डेक्कन पाेलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील दोन्ही आरोपींचा पाेलीस शाेध घेत आहेत.

विश्वजीत विनायकराव जाधव आणि अभिजित विनायकराव जाधव ( दोघे रा. डेक्कन जिमखाना ) अशी गुन्हा दाखल झालेल्या दाेघांची नावे आहेत. खडकवासला धरण परिसरातील मांडवी खुर्द गावातील शेट्टी फार्म हाऊसमध्ये बिबट्याची शिकार करुन अवयव लपवून ठेवले असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ आणि पथकाने रविवारी फार्महाऊसवर छापा टाकला. त्यावेळी तेथील एका कपाटात बिबट्याचा नखांसह पंजा सापडला.

दरम्यान, फर्ग्युसन रस्त्यावरील प्रसिद्ध वैशाली हॉटेलमध्ये टोळक्याने तोडफोड करुन कामगारांना मारहाण केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. याप्रकरणी विश्वजित जाधव याच्यासह चौघांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याबाबत जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरु होते.

Web Title: Claws and Claws in Farmhouse Closets by Hunting Leopards A case has been registered against entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.