शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणीत भरतोय बिनशिक्षकाचा वर्ग

By admin | Updated: August 30, 2016 01:01 IST

येथील पालिका शाळा क्रमांक ५५ मुले येथील सातवीच्या शाळा सुरू झाल्यापासून अद्याप शिक्षकच नसल्याने विद्यार्थी दुपारी येतात व सायंकाळी न शिकता घरी जातात.

रहाटणी :  येथील पालिका शाळा क्रमांक ५५ मुले येथील सातवीच्या शाळा सुरू झाल्यापासून अद्याप शिक्षकच नसल्याने विद्यार्थी दुपारी येतात व सायंकाळी न शिकता घरी जातात.याला जवाबदार कोण, असा सवाल पालक उपस्थित करीत आहेत. या शाळेत सकाळी मुलींची व दुपारी मुलांची शाळा भरते. मुलींच्या वर्गाची संख्या ५६० पटसंख्या आहे, तर मुलांच्या वर्गाची ५३० पटसंख्या आहे. येथे पहिली ते सातवी असे वर्ग भरतात. या शाळेला मागील फेब्रुवारी २०१६पासून मुख्याध्यापकच नाही. सर्व कामकाज येथील एक शिक्षिका प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहत आहेत. या शाळेला संच मान्यतेनुसार १८ शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या १२ शिक्षकच कार्यरत आहेत. खरे तर या शाळेला एक मुख्याध्यापक, ५ पदवीधर , १२ उपशिक्षक अशा पद्धतीने शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र, मुख्याध्यापक नाही, दोन पदवीधर शिक्षक कमी आहेत. तर एक उपशिक्षक सक्तीच्या रजेवर आहे. त्यामुळे कार्यरत आहेत त्या उपशिक्षकांना वरच्या वर्गाला शिकविता येत नाही. म्हणून सातवीचा वर्ग शिक्षकाविना आहे. या वर्गाची पटसंख्या ४४ आहे. या शाळेत पदवीधर शिक्षकाची आवश्यकता असतानासुद्धा कोणाच्या मर्जीमुळे बदली करण्यात आली, हा खरा प्रश्न आहे.शाळा सुरू होऊन अडीच महिने झाले, विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे काय? काही दिवसांवर सहामाही परीक्षा येणार. विद्यार्थी शिकणार कधी? परीक्षेत लिहिणार काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या धोरणानुसार ३० पट संख्येला एक शिक्षक असावा लागतो. मात्र, पालिकेच्या अनेक शाळांमध्ये पटसंख्या नसतानाही शिक्षक मुबलक आहेत . काही शाळांमध्ये २० पटसंख्या असणारे वर्ग आहेत, तरी त्या ठिकाणी शिक्षक आहेत. तर काही शाळांमध्ये वर्ग नसतानाही अतिरिक्त शिक्षक आहेत. याकडे पालिकेचे शिक्षण विभाग व शिक्षण मंडळ डोळेझाक का करीत आहेत, हा खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)