दहावीच्या विद्यार्थिनीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; इंदापूरातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 19:58 IST2023-03-13T19:58:26+5:302023-03-13T19:58:36+5:30
रंगपंचमीला रंग खेळून सायंकाळी मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसल्यानंतर विद्यार्थिनीला अचानक ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला

दहावीच्या विद्यार्थिनीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; इंदापूरातील दुर्दैवी घटना
इंदापूर : सरडेवाडी येथील जाधववस्तीमध्ये रहाणा-या सृष्टी सुरेश एकाड (वय १६ वर्षे) या दहावीच्या वर्गात शिकणा-या मुलीचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाला.रविवारी (दि.१२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
रंगपंचमीच्या सणानिमित्त दिवसभर रंग खेळून सायंकाळी मैत्रिणीबरोबर गप्पा मारत बसल्यानंतर सृष्टीला अचानक ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. तिला इंदापूरातील खाजगी दवाखान्यात आणण्यात आले. तपासणीनंतर तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सृष्टी ही इंदापूरातील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती. मनमिळाऊ व अभ्यासात हुशार असणारी सृष्टी विविध शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे.सोमवारी दहावीचा शेवटचा पेपर आहे,तो देण्यापूर्वीच तिचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.