शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांची ९०० कामे लागणार मार्गी

By admin | Updated: March 10, 2017 05:11 IST

महापालिका प्रशासनाकडून सलग ११वी सहभागी अंदाजपत्रकाची प्रक्रिया पूर्ण करण्यात असून नागरिकांनी सुचवलेली ९०० विकासकामे आगामी अंदाजपत्रकात मार्गी लागणार

- दीपक जाधव,  पुणेमहापालिका प्रशासनाकडून सलग ११वी सहभागी अंदाजपत्रकाची प्रक्रिया पूर्ण करण्यात असून नागरिकांनी सुचवलेली ९०० विकासकामे आगामी अंदाजपत्रकात मार्गी लागणार आहे. नागरिकांकडून आलेल्या दहा हजार सूचनांची छाननी करून या कामांना मान्यता देण्यात आली आहे. सहभागी अंदाजपत्रकाची संकल्पना सातत्यपूर्ण राबवून पुणे महापालिकेने एक चांगली परंपरा निर्माण केलेली आहे.महापालिकेच्या वतीने २००६-०७ पासून सहभागी अंदाजपत्रकाची संकल्पना राबविण्यास सुरूवात करण्यात आली. या संकल्पनेअंतर्गत नागरिकांकडून प्रशासनाला विकासकामे सुचविली जातात, त्यानुसार प्रशासनाकडून कार्यवाही केली जाते. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी ३७ कोटी ५० लाख रुपयांची स्वतंत्र तरतूद केली जाते. हा निधी केवळ नागरिकांनी सुचविलेल्या विकासकामांवर खर्च केला जातो. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये महापालिका निवडणुका असल्याने यंदा महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून मार्च अखेरीस सादर होणार आहे. त्यासाठी सहभागी अंदाजपत्रकाची प्रक्रिया प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. महापालिकेकडून सलग ११ वर्षे सातत्याने ही संकल्पना राबविण्यात येत असल्याने त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा दहा हजार नागरिकांनी प्रशासनाकडे विविध स्वरूपाची विकासकामे सुचविली. त्यापैकी ९०० विकासकामांचा समावेश अंदाजपत्रकामध्ये करण्यात आला आहे. एका व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंतचे काम सुचविता येते. आपल्या प्रभागातील नेमके प्रश्न काय आहेत. त्यासाठी कोणत्या सेवा, सुविधा आवश्यक आहेत, याची चांगली जाण स्थानिक नागरिकांना असते. त्यामुळे त्यांनी महापालिकेला त्याबाबतची कामे सुचवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून आॅगस्ट महिन्यामध्ये नागरिकांना केले जाते. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांच्या लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतर प्रभाग समितीच्या अध्यक्षकडून बैठक घेतली जाते. नागरिकांच्या सूचनांनुसार कामांचा प्रारूप आराखडा तयार केला जातो. त्या कामांना मान्यता दिली जाते. प्रभाग समितीने मान्यता दिलेल्या कामांचा आयुक्तांकडून मुख्य अंदाजपत्रकामध्ये समावेश केला जातो. प्रामुख्याने पदपथ, पाणीपुरवठा, गटारे आदी कामांना प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर पदपथांची दुरूस्ती करणे, रस्त्यांवर दिवे बसविणे, गटारांची व्यवस्था करणे आदी छोट्या स्वरूपाची कामे यामुळे मार्गी लागतात. त्यामुळे नागरिकांनाही चांगला दिलासा मिळतो आहे.महापालिकेच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या नागरिकांच्या सहभागी अंदाजपत्रकासाठी महापालिकेला नुकतेच ‘ई. रामचंद्रन पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे. बंगळुरूच्या जनाग्रह सेंटर फॉर सिटीजनशिप या संस्थेच्या वतीने पुणे महापालिकेच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. प्रभागासाठी ५० लाखसहभागी अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक प्रभागासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. एकूण ३७ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद यासाठी अंदाजपत्रकामध्ये केली जाते. एका कामासाठी वैयक्तिक स्तरावर ५ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.सहभागी अंदाजपत्रकामध्ये सहभागी अंदाजपत्रकासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुचविलेल्या विकासकामांची ९० टक्क्यांपर्यंत अंमलबजावणी होते. यामुळे सहभागी अंदाजपत्रकाच्या संकल्पनेस चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे.- उल्का कळसकर, मुख्य लेखापाल