नागरिकांनो सावधान...! पाणी बिलाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक; महापालिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 15:03 IST2025-04-17T15:02:49+5:302025-04-17T15:03:27+5:30
थकबाकीदार मीटरजोड थकबाकी बिल न भरल्यास त्यांचे नळजोड बंद करण्यात येतील

नागरिकांनो सावधान...! पाणी बिलाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक; महापालिकेचा इशारा
पुणे : पाणी बिल न भरल्यास नळजाेड बंद केला जाईल, असा मॅसेज पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी अशा काेणत्याही मॅसेजला बळी पडू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
थकबाकीदार मीटरजोड थकबाकी बिल न भरल्यास त्यांचे नळजोड बंद करण्यात येतील, असे मॅसेज काही नागरिकांना गेल्या दाेन- तीन दिवसांपासून येत आहेत. यासंदर्भातील तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आल्या आहेत. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशाेर जगताप यांनी असा मॅसेज महापालिकेकडून पाठविला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी अशा मॅसेजला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी अनोळखी मोबाइल क्रमांक व व्यक्ती यांचयासोबत कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करू नयेत. मॅसेजमधील लिंकशी कनेक्ट होऊ नये. महापालिकेच्या मीटर विभागाकडील मीटर बिलावर नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेचा व्हाॅट्सॲप क्रमांक 8888251001 किंवा http://watertax.punecorporation.org याद्वारे मीटर बिलाची संपूर्ण माहिती व ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच बरोबर अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिका कॉल सेंटर क्र. 1800103222 वर किंवा संबंधित मीटर रीडरकडे संपर्क साधावा, असे आवाहन नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.