शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा भाडेकरूंच्या वास्तव्यामुळे नागरी सुरक्षा धोक्यात

By admin | Updated: June 28, 2015 00:10 IST

भाडेकराराची योग्य प्रमाणात मुद्रांक शुल्क भरून, पद्धतशीर नोंद करून त्याची एक प्रत संबंधित पोलीस ठाण्याकडे देणे कायद्याने बंधनकारक आहे.

तळेगाव स्टेशन : भाडेकराराची योग्य प्रमाणात मुद्रांक शुल्क भरून, पद्धतशीर नोंद करून त्याची एक प्रत संबंधित पोलीस ठाण्याकडे देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, हजारो लोक या नियमांचे उल्लंघन करत तळेगाव दाभाडे परिसरात वास्तव्यास असल्याने नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तळेगाव दाभाडे नगर परिषद उद्योगनगरी व शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आल्यानंतर राज्य आणि परराज्यांतून तात्पुरत्या वास्तव्यास येणाऱ्या नोकरदार, शिकाऊ कामगार आणि विद्यार्थी यांची संख्या वाढली. त्यामुळे परिसरात शेकडो गृहप्रकल्प उभे राहिले. सधन स्थायिक सदनिका विकत घेऊन त्या भाडेतत्त्वावर देण्यास आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून पाहू लागले. सदनिका विकत वा भाड्याने देणे-घेणे या व्यवहारात एजंटगिरीचाही उदय झाला. मध्यंतरी तळेगाव दाभाडे परिसरातून भाडेतत्त्वावर राहत असलेल्या एका संशयित नक्षलवाद्यास ताब्यात घेतल्यानंतर संबंधित घरमालकाने भाडेकरार व त्याची प्रत पद्धतशीरपणे संबंधित खात्याकडे जमा केली नसल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर तरी पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या घरमालक व भाडेकरूंवर कारवाई करणे गरजेचे होते. भाडेतत्त्वावर वा मुखत्यारपत्र बनवून राहणारे अनेक ठग जबरी चोऱ्या, गुन्हे व आर्थिक फसवणूक करून, परांगदा झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र, त्याची कोणतीही सखल माहिती पोलीस व घरमालकांकडे उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. इंद्रायणी कॉलनीतील एका इमारतीमध्ये केवळ मुखत्यारपत्राद्वारे एकाच सदनिकेवर अनेक बँकांकडून कर्ज घेऊन, तसेच तळेगावातील अनेक सावकरांकडून उसनवारीने लाखो रुपये घेऊन गायब झालेल्या एका दक्षिणी फिटरचे प्रकरण गुलदस्तातच आहे. भाडेकरुंची माहिती, भाडेकराराची प्रत पोलीस यंत्रणेकडे असणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पिंपरी-चिंचवड, पुण्याप्रमाणेच पोलीस व प्रशासनाने कोम्बिंग आॅपरेशनद्वारे कायद्याचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)