शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

अबब..! पुण्यात कोथिंबीर गड्डी ८० रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 1:16 PM

सर्वसामान्य नागरिकांच्या किचनमधील कोथिंबीर गायब झाली आहे.

ठळक मुद्देपावसामुळे हाताशी आलेला शेतमाल खराब होण्याचे प्रमाणात वाढ मेथी, मुळा, कांदापातसह पालेभाज्याही आवाक्याबाहेरगुलटेकडी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या अवघ्या ४० हजार गड्ड्यांची आवक

पुणे : सर्वसामान्य नागरिकांच्या किचन मधील कोथिंबीर गायब झाली आहे. रविवारी गुलटेकडी मार्केटयार्डमधील तरकारी विभागात कोथिंबिरीच्या अवघ्या ४० हजार गड्ड्यांची आवक झाली. यामुळे रविवार (दि.७) रोजी घाऊक बाजारामध्ये कोथिंबिरीला दर्जानुसार २५ ते ५० रुपये दर मिळाले. तर शहराच्या विविध भागात किरकोळ व्यापा-याकडे कोथिंबिरीची हीच गड्डी तब्बल ८० रुपयांच्या पुढे गेली. तर मेथी, मुळा, कांदापातसह अन्य सर्व पालेभाज्यादेखील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.     जिल्ह्यात सर्व भागात जोरदार पाऊस झाल्याने हाताशी आलेला शेतमाल खराब झाला आहे. यामुळे आवक मोठ्या प्रमाणत घट झाली आहे. यामध्ये सर्वांधिक फटक कोथिंबीर पिकाला बसला आहे. त्यात मागणी अधिक आणि आवक कमी झाल्याने कोथिंबीरीचे दर गगनाला भिडले आहेत. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मधील तरकारी विभागात गेल्या काही दिवसांपासून पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली आहे. उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली होती. जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु गेल्या आठ दिवसांपासून पाऊस लागून राहिल्याने हाताशी आलेला शेतमाल पाण्यात गेला. यामुळे आवक खूपच कमी झाली आहे. त्या तुलनेत शहर, परिसरातून मागणी जास्त आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव तेजीत आहेत. -----------------गुजरातची ‘सटाणा’ कोथिंबीरी पुणे जिल्ह्यात बहुतेक सर्वच भागात सर्वांधिक पाऊस झाल्याने येथे येणारी गावरान व वासाची कोथिंबीर तर बाजारामध्ये अत्यंत तुरळक प्रमाणात येते आहे. परंतु सध्यस्थिती गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये गुजरात येथील ‘सटाणा’ जातीची कोथिंबीरीची मोठी आवक होत आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांकडून कोथिंबीरीची आता लागवड करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात कोथिंबिरीची जास्त आवक होईल. सध्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे भाव घाऊक बाजारासह किरकोळ बाजारात वाढले आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर पालेभाज्यांचे दर खाली येतील अशी शक्यता आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी व्यक्त केली.

रविवारी गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील पालेभाज्याचे घाऊक बाजारातील दर (शेकडा गड्डी)  कोथिंबीर : २५००-५०००, मेथी : १५००-२५००, शेपू : १०००-१५००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : १०००-१५००, करडई : ५००-८००, पुदिना : ३००-८००, अंबाडी : १०००-१५००, मुळे : १५००-२०००, राजगिरा : १०००-१२००, चुका : ८००-१०००, चवळई : ८००-१२००, पालक : ५००-८००.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डvegetableभाज्या