शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

'चित्राताई व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या टॉपर, आता बदामाचा खुराक सुरू करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 2:36 PM

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यानंतर, आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर प्रहार केला आहे. 

ठळक मुद्देभाजपाने  ठाकरे सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. "आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे

पुणे - दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी काल ६ दहशतवाद्यांना अटक केली. प्राथमिक तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशात आणखी दहशतवादी असणाऱ्याची शक्यता तपाय यंत्रणांनी वर्तवली आहे. यावरुनही आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या टीकेवरुन आता राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

दिल्ली पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी काही जणांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. त्यानुसार त्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजपाने  ठाकरे सरकारवर यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. "आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का?" असं म्हणत भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यानंतर, आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर प्रहार केला आहे. 

चित्राताईंना महाराष्ट्रद्वेषाने एवढं पछाडलं आहे की, दहशतवादी दिल्लीत पकडले असतानाही महाराष्ट्रात पकडल्याचं सांगत आहेत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या टॉपर आहेत ताई, आता बदामाचा खुराक सुरू करा, म्हणजे बुद्धीला चढलेला गंज कमी होईल, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ

"दिल्ली पोलीस येऊन मुंबईतील आतंकवादी पकडताहेत मग आपली पोलीस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीय का??" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनंतर स्वत: दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना थेट मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मुंबई पोलीस आयुक्तांसोबत बैठक सुरू असून चौकशीत त्यांना मिळालेली माहिती ते मुंबईच्या आयुक्तांना देत आहेत. 

संजय राऊतांवरही साधला होता निशाणा

"संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील स्त्रीबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृतीचं हे उदाहरण आहे. अहो राऊत. एका महिलेवरती अमानवीय अत्याचार झालेला आहे. त्यामुळे तिचा ज्या यातनेने मृत्यू झाला असेल. तुम्हाला ते या जन्मातही समजणार नाही. अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तिचा वापर करता आणि महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशची तुलना करता. नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झालेला आहे. फक्त भावनिक गप्पा झोडायच्या आणि मग घटनेनंतर म्हणायचे…ताई, घाबरू नका.. चिंता करू नका…हल्लेखोरांना शिक्षा होईल... आणि फक्त अशी भावनिक भुरळ घालायची...असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपTerrorismदहशतवादPoliceपोलिसPuneपुणेAnti Terrorist Squadएटीएस