शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

बालदिन विशेष! सांगा, मुलांनी खेळाचं कुठ? शहरात मैदाने आहेत कुठं? मुलांचा श्वास ४ भिंतींमध्ये कोंडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 13:04 IST

मोबाईलच्या आहारी गेलेली पिढी हळूहळू तणाव, चिडचिड आणि एकटेपणात अडकत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

पुणे : शहरात झपाट्याने होणाऱ्या नागरीकरणामुळे, आता खुली मैदाने दिसणे जवळपास दुरापास्त झाले आहे. यामुळे मुलांनी खेळायचं कुठं? असा सवाल पुणेकरांनी उपस्थित केला आहे. ७५ लाख लोकसंख्या असलेल्या पुण्यात लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ १०५ महापालिकेची बंदिस्त क्रीडा संकुल आहेत, त्यातही जवळपास २७ क्रीडा संकुल बंदच आहे. काँक्रिटीकरणाच्या जंगलात मुलांचा श्वास मैदानअभावी चार भिंतींमध्ये कोंडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कधी काळी क्रिकेट, लगोरी, पकडा-पकडीच्या आवाजाने दुमदुमणाऱ्या पुण्यात लहान मुलांच्या किलबिलाचा नव्हे, तर वाहनांचा आवाज ऐकू येतो आहे. कारण मुलांना खेळण्यासाठी आता खुली मैदानेच उरलेलीच नाहीत आणि जी थोडी उरली आहेत, तीही बांधकामांच्या सावलीत हरवून गेली आहेत. आज मुलं मैदानावर नाहीत, तर घरात एका कोपऱ्यात किंवा सोसायटीच्या कट्ट्यावर मोबाईलमध्ये अडकली आहेत हेच आजच्या बालदिनाचं कटू वास्तव आहे.

शहराची वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारा विकास यामुळे मोकळ्या जागा राहिलेल्याच नाहीत. पुण्याच्या सत्तर लाखांच्या घरात असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्या महापालिकेची केवळ १०५ सार्वजनिक क्रीडा संकुल आहेत, याचा अर्थ हजारो मुलांमागे फक्त एकच क्रीडा संकुल आहे.

गेल्या काही वर्षांत अनेक मोकळी जागा निवासी प्रकल्प, पार्किंग, विवाहमंडप आणि व्यापारी वापरासाठी देण्यात आली आहे. परिणामी, मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा मिळणं अशक्य झालं आहे. काही ठिकाणी शाळांच्या खेळाच्या मैदानांवर क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या मुलांचे सराव चालू असतात, मग इतर मुलांनी खेळायचं कुठं? महापालिकेच्या बहुतांश शाळेला मैदानच नाही, तर मोकळ्या मैदानावर बांधकामं उभी राहत आहेत. यामुळे मुलांचा कल आता मैदानी खेळांवरून मोबाईल गेम्सकडे वळला आहे. फोनवरचे ‘गेम’, ‘रील्स’, ‘व्हिडीओ’ हेच त्यांचं “नवं मैदान” बनलं आहे. तासन्तास स्क्रीनसमोर बसल्याने मुलांच्या डोळ्यांवर, मनावर आणि शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत. मुलांच्या शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी खुली मैदाने महत्त्वाची असतात. तिथे ते हार-जीत, सहकार्य, संयम शिकतात, पण आजच्या डिजिटल जीवनशैलीतून ही सामाजिक शिकवण नाहीशी होत चालली आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मुलांची सक्रियता आणि आनंदही कमी

आजची मुलं मैदानं सोडून मोबाईलमध्ये अडकली आहेत. पूर्वी दुपारभर खेळणारी, धावणारी, गटात रमणारी मुलं आता स्क्रीनच्या मर्यादेत बंदिस्त झाली आहेत. मैदान हे फक्त खेळाचं ठिकाण नसून ते मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाचं केंद्र असतं. इथेच मुलं टीमवर्क, सहनशीलता, स्पर्धा आणि मैत्री शिकतात, पण आज मैदाने कमी झाली, तशीच मुलांची सक्रियता आणि आनंदही कमी झाला. मोबाईलच्या आहारी गेलेली पिढी हळूहळू तणाव, चिडचिड आणि एकटेपणात अडकत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

महापालिकेच्या अखत्यारित लहानापासून मोठ्यांपर्यंत १०५ क्रीडा संकुल आहेत. ती सर्व बंदिस्त आहेत. -प्रदीप महाडिक, प्रशासक अधिकारी

शाळा जितकी महत्त्वाची आहे, तितकंच मैदानही आवश्यक आहे. प्रत्येक शाळेत खेळाचे मैदान असणे अत्यावश्यकच आहे, पण त्यासोबत सार्वजनिक ठिकाणीही मैदाने जपली गेली पाहिजेत आणि त्यांची संख्या वाढवली पाहिजे. मैदानांचा अभाव म्हणजे मानसिक अस्वस्थतेची लाट ओढवण्याचे आमंत्रणच आहे आणि त्या लाटेला तोंड देण्याची ताकद जगातील कोणत्याही सरकारकडे नाही. -  डॉ. भूषण शुक्ला, बाल मानसोपचारतज्ज्ञ.

मुलांच्या आयुष्यात मैदान म्हणजे फक्त खेळाचं ठिकाण नाही, तर त्यांच्या आनंदाचं, आरोग्याचं आणि आत्मविश्वासाचं शाळाच असते. अभ्यासाप्रमाणेच मैदानही आवश्यक आहे. कारण पुस्तकं बुद्धी घडवतात, पण मैदान मन आणि शरीर दोन्ही घडवतं. - करुणा जाधव, पालक

पुणे महापालिका क्रीडा विभागाच्या अखत्यारित बंद क्रीडा संकुल

१) राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल, आदिशक्ती योग भवन शेजारी, पाषाण

२) जलतरण तलाव क्रीडा संकुल, नाला गार्डन शिवदर्शन, पर्वती३) मदर टेरेसा क्रीडा संकुल, रणकपूर सोसायटी, विश्रांतवाडी

४) कै. केशवराव ढेरे जलतरण तलाव, चिमा गार्डन, येरवडा५) भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जलतरण तलाव व्यायामशाळा, महादेव मंदिर, सुतारवाडी-पाषाण

६) औंध जलतरण तलाव, औंध गाव७) स्व. खासदार विठ्ठलराव तुपे क्रीडा संकुल, हडपसर

८) स्व. खासदार विठ्ठलराव तुपे शूटिंग रेंज, मगरपट्टा रोड, हडपसर९) वसंतराव भागवत क्रीडा संकुल, कवडी अड्डा, सदाशिव पेठ

१०) छत्रपती संभाजी महाराज व्यायामशाळा, कोंढवा११) प्ले ग्राउंड, बालेवाडी

१२) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे मल्टिपर्पज हॉल, कर्वेनगर१३) लोकनेते गोपीनाथ मुंडे व्यायामशाळा, कोंढवा बुद्रुक

१४) स्व. आमदार सूर्यकांत आप्पा लोणकर व्यायामशाळा, संत गाडगेबाबा मनपा शाळेजवळ, कोंढवा१५) झाशीची राणी लक्ष्मीबाई योगा केंद्र, वारजे

१६) तक्षशिला क्रीडानगरी, साकोरे नगर, विमान नगर रोड१७) कै. बाळासाहेब रामभाऊ कवडे क्रीडांगण व क्रीडा संकुल, घोरपडी गाव

१८) डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल, सहकारनगर समतानगर, पर्वती१९) बुद्धवासी चिमाजी अल्हाट क्रीडांगण, महंमदवाडी

२०) कै. विठ्ठल नामदेव जाधव क्रीडा संकुल, वडगाव२१) कै. अण्णासाहेब मारुती कोंढरे पाटील चिल्ड्रन प्लेग्राउंड, आंबेगाव बुद्रुक

२२) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल, वडगाव२३) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम चिखलवाडी, बोपोडी

२४) स्वामी विवेकानंद जलतरण तलाव व जिम्नॅशियम, बावधन२५) बॅडमिंटन हॉल, वारजे

२६) ह. भ. प. पुंडलिक विठ्ठल टिळेकर क्रीडांगण, मौजे कात्रज, सुखसागर नगर२७) पुणे पेठ बावधन व्यायामशाळा, बावधन

English
हिंदी सारांश
Web Title : Pune's vanishing playgrounds: Kids confined indoors, craving open spaces.

Web Summary : Pune faces a shortage of playgrounds, forcing children indoors and onto screens. Limited sports complexes and converted open spaces impact kids' physical and social development, experts warn. Schools also lack grounds.
टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणSocialसामाजिकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाStudentविद्यार्थीHealthआरोग्य