नायगावातून बालिकेचे अपहरण

By Admin | Updated: September 25, 2015 01:02 IST2015-09-25T01:02:51+5:302015-09-25T01:02:51+5:30

नायगाव (ता. मावळ) येथून एक महिलेने साडेतीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अदिती हरिराम शिंदे (वय साडेतीन वर्षे) या बालिकेचे शेजारी राहणाऱ्या राणी

Child abduction from Naigavah | नायगावातून बालिकेचे अपहरण

नायगावातून बालिकेचे अपहरण

कामशेत : नायगाव (ता. मावळ) येथून एक महिलेने साडेतीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अदिती हरिराम शिंदे (वय साडेतीन वर्षे) या बालिकेचे शेजारी राहणाऱ्या राणी या महिलेने अपहरण केले आहे. २१ सप्टेंबरला अदितीच्या आईकडे येऊन राणीने अदितीला फिरायला घेऊन जाते, असे
सांगून तिला सकाळी साडेआठला राणी घेऊन गेली. पुन्हा परतलीच नाही. त्यामुळे अदितीची आई सुरेखा हरिराम शिंदे (रा. नायगाव) हिने कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
साडेतीन वर्षांची अदिती फासेपारदी व मराठी भाषा बोलते. सडपातळ बांधा, बॉयकट
पद्धतीने केस, गोरा वर्ण, उभट चेहरा, अंगात पांढऱ्या रंगाचा फ्रॉक असे वर्णन आहे. या संदर्भात
राणी हिच्यावर ३६३ कलमान्वये
गुन्हा नोंद झाला असून, पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
 

Web Title: Child abduction from Naigavah