शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लोहगावचे छत्रपती शिवरायांचे संग्रहालय

By admin | Updated: September 13, 2016 01:19 IST

सुटीचा दिवस आहे. कुठे तरी फिरायला जाण्याच्या विचारात आहात..? कमी वेळेत फिरून येता येईल, असे ठिकाण शोधताय तर तुमच्यासाठी लोहगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज संग्रहालय

श्रीकांत बोरावके,  आळंदीसुटीचा दिवस आहे. कुठे तरी फिरायला जाण्याच्या विचारात आहात..? कमी वेळेत फिरून येता येईल, असे ठिकाण शोधताय तर तुमच्यासाठी लोहगाव येथील छत्रपती शिवाजीमहाराज संग्रहालय एक उत्तम ठिकाण ठरू शकते. लोहगाव येथे छत्रपती शिवाजीमहाराज संग्रहालय आहे. छावणीच्या आकारातील शेड उभारत हे संग्रहालय सजवले असून प्रवेश करताच पहिल्या छावणीतील भवानीमातेची व छत्रपती शिवाजीराजांची शिल्पाकृती काही काळ आपल्याला मोहीत करून जाते. त्याच छावणीत शिवाजीराजांची पितळ धातूची अर्धाकृती मुखवटा प्रतिकृती असून, तीही पाहण्यासारखी आहे. शिवकालापासून ते सध्याच्या काश्मीर प्रश्न, गोध्रा हत्याकांड अशा विविध ऐतिहासिक व घटनांचा आढावा तैलचित्रे व फलकांच्या माध्यमातून इथे घेण्यात आला आहे. विशेषत: छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनकार्य व घटनांवर आधारित चित्रांचे प्रदर्शन पाहण्यासारखे आहे. चार ते पाच छावण्या उभारून त्यात हे चित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. अहल्याबाई होळकर यांचाही जीवनपट उत्तमरीत्या तैलचित्रातून साकारला असून, त्यातून त्यांच्या कार्याला न्याय द्यायला चित्रकार यशस्वी ठरला आहे. बादशहा शहाजहानच्या मृत्यूचे लिखित पत्रांवरून साकारलेले काल्पनिक छायाचित्र, मोडी लिपीतील पत्रव्यवहार, काश्मिरी पंडितांचा प्रश्न, गुजरातमधील गोध्रा हत्याकांडावर टाकलेला प्रकाश, भारतातील धर्मांची प्रगती व ऱ्हास यावरील माहितीफलकांच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश ज्ञानात भर पाडणारा आहे. येथील नैसर्गिक परिसरही सुंदर असून, संग्रहालयाच्या मध्यभागी असलेले तळे व त्यावर उभारलेला लाकडी पूल संग्रहालयाच्या सौंदर्यात अधिकच भर पाडत आहे. हे संग्रहालय आठवड्याचे सातही दिवस खुले असून सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत भेट देणाऱ्यांसाठी ते खुले असते. शाळा, महाविद्यालयाबरोबरच पर्यटकही मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देत असून, एक दिवसाची छोटी सहल या ठिकाणी आयोजित करता येऊ शकते. आळंदी, तुळापूरपासून जवळच असल्याने भाविकही या छोट्या पण आकर्षक संग्रहालयाला भेट देताना दिसून येतात.