कुरकुंभ MIDC मधून साडेपाच कोटींचे केमिकलची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 13:08 IST2022-03-18T13:05:56+5:302022-03-18T13:08:06+5:30

कुरकुंभ परिसरात चोरीचे सत्र सुरूच...

chemicals worth 5 crore stolen in kurkumbh industrial area pune latest news | कुरकुंभ MIDC मधून साडेपाच कोटींचे केमिकलची चोरी

कुरकुंभ MIDC मधून साडेपाच कोटींचे केमिकलची चोरी

कुरकुंभ :कुरकुंभ (ता.दौंड) येथील औद्योगिक क्षेत्रात केमिकल चोरीचं सत्र सुरुच असून त्यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. इटरनिस फाईन केमिकल या कंपनीतून रोडियम ऑन अल्युमिना नावाचे तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे केमिकल चोरीला गेल्याची घटना दौंड पोलीस स्थानकात दाखल झाली आहे.

त्यामुळे नुकत्याच मेलजर कंपनीतील लाखो रुपयांच्या मालाचा तपास सुरू असताना ह्या नवीन गुन्ह्याची नोंद झाल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कुरकुंभ भागात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. त्यामुळे तिथे कंपन्यांना लागणारी विविध महागडी रसायने असतात. त्यामुळे आता चोरट्यांची नजर आता या कंपन्यांमधील रसायनांवर पडली आहे. यामुळे या भागात रसायन चोरींचे सत्र सुरूच असल्याचे दिसतेय.

Web Title: chemicals worth 5 crore stolen in kurkumbh industrial area pune latest news