शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदाखले तपासून पुण्यातील बांगलादेशी शोधून काढा, त्यांना परत पाठवा - किरीट सोमय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:12 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने गेल्या वर्षभरात तीन लाख बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहेत

पुणे: संपूर्ण महाराष्ट्रात किमान ५० लाख बोगस बांगलादेशी मतदार आहेत. महाराष्ट्रात १ एप्रिलपासून ‘एसआयआर’ सुरू होणार आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये ६४ लाख बोगस मतदार तर बिहारमध्ये ५७ लाख बोगस मतदार सापडले. त्यामुळे महाराष्ट्रात ५० लाख तर पुण्यात ४०-५० हजार बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरित्या राहात असल्याचा माझा अंदाज आहे. त्यामुळे जन्मदाखले तपासून पुण्यातील बांगलादेशी शोधून काढून त्यांना परत पाठवा’, अशा सूचना भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुणे महापालिकेतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.

महापौर मंजूषा नागपुरे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गटनेते गणेश बीडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शैलेश संके, आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे, संगणक व तंत्रज्ञान विभाग प्रमुख राहुल जगताप यांच्यासह अधिकारी, संबंधित विभागप्रमुख आदींची बैठक सोमय्या यांनी महापालिकेत घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पुणे महापालिकेने गेल्या तीन वर्षांत दिलेली जन्म प्रमाणपत्र तपासा, तसेच घरोघरी जाऊन छाननी करा. जी व्यक्ती येथे जन्मली नाही त्याची माहिती काढा, त्यांच्या आईवडिलांच्या जन्मठिकाणाची माहिती घ्या. जी व्यक्ती येथे जन्मलीच नाही, त्याचे पुरावे नाहीत त्यांच्यावर कारवाई करा,’ अशा सूचना दिल्याचे सोमय्या म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने गेल्या वर्षभरात तीन लाख बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहेत. रोहिंग्यांच्या घुसखोरीबाबतही राज्य सरकारने नवीन कार्यपद्धती (एसओपी) बनवली आहे. कामगार मंत्र्यांनी या संदर्भात निर्देश दिले आहेत. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर ‘कोम्बिंग ऑपरेशन’ होईल, असे सोमय्या यांनी सांगितले.

उशिराने मागणी केलेल्या जन्म व मृत्यू दाखल्यांची संख्या

२०२१ : २७८२०२२ : २६३

२०२३ : १८०२०२४ : २४२

२०२५ : ३३१२०२६ : ११९

English
हिंदी सारांश
Web Title : Somaiya Demands Probe to Find, Deport Bangladeshi Nationals in Pune

Web Summary : Kirit Somaiya urged Pune officials to verify birth certificates to identify and deport illegal Bangladeshi residents. He estimates thousands reside in Pune. He cited concerns about fraudulent voters and mentioned government efforts to address the issue, including canceling fake birth certificates and planned operations.
टॅग्स :PuneपुणेKirit Somaiyaकिरीट सोमय्याPoliticsराजकारणBangladeshबांगलादेशWomenमहिलाPoliceपोलिसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस