बार्टी संस्थेच्या प्रभारी महासंचालकपदी दि. रा. डिंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:14 IST2021-09-04T04:14:25+5:302021-09-04T04:14:25+5:30

डिंगळे यांनी बार्टी, मुख्यालयातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. आणि त्यानंतर प्रभारी ...

As the in-charge director general of Barty organization. Ra. Dingle | बार्टी संस्थेच्या प्रभारी महासंचालकपदी दि. रा. डिंगळे

बार्टी संस्थेच्या प्रभारी महासंचालकपदी दि. रा. डिंगळे

डिंगळे यांनी बार्टी, मुख्यालयातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. आणि त्यानंतर प्रभारी महासंचालक बार्टी, पुणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले सामाजिक समतेचे विचार व त्यांना अभिप्रेत कार्य बार्टी संस्थेच्या माध्यमातून करणार आहे, तसेच तळागाळातील लोकांपर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व बार्टी संस्थेच्या विविध योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविणार असल्याचे डिंगळे यांनी सांगितले. प्रवीण कोरगंटीवार, प्रभारी निबंधक, बार्टी यांनी डिंगळे, यांना संविधानाची प्रत भेट देऊन स्वागत केले. यावेळी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: As the in-charge director general of Barty organization. Ra. Dingle