शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

चोरांचा कहर! देवांचे मुखवटे, घंटा, समई साहित्य चोरले; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 17:03 IST

आरोपींकडून गेल्या १०७ वर्षापुर्वीच्या पानेश्वराची मुर्ती, दोन मुकुट, दोन समई, एक पंचार्थी, मूषक, १५ लहान मोठ्या घंटा आदी माल पोलिसांनी हस्तगत केला

सुपे : सर्वसामान्य नागरिकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा भाग असलेल्या मंदिरातील देवांची मुर्ती, मुखवटे, घंटा, समई तसेच मूषक आदी चोऱ्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्याची दमदार कामगिरी सुपे पोलिसांनी केली आहे. यावेळी सुपे पोलिसांनी फिल्मी टाईल्सने लोणंद पर्यंत पाठलाग करीत तिघांना अटक केल्याची घटना सोमवारी ( दि. १६ ) पहाटे घडली.          ओमकार शशिकंत सांळुखे ( रा. आनंदपुर ता. वाई सध्या रा. शिरवळ, पंढरपुर फाटा ता. खंडाळा जि. सातारा ), तुषार अनिल पवार ( रा. दत्तनगर सांगवी रोड ता. खंडाळा जि.सातारा ), सौरभ दत्तात्रय पाटणे ( रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा ) आदीं तिघांना अटक केली आहे तसेच या गुन्ह्यात  एक विधीसंघर्ष बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.     पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, सुपे पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना दंडवाडी गावच्या हद्दीत एक कार रस्त्याच्या कडेला नंबर प्लेटवर चिखल लावुन संशयीतरित्या थांबलेली दिसली. यावेळी गस्तीतील अंमलदार गाडीजवळ जाताच गाडीतील इसमाने गाडी वेगात सुपे बाजुकडे घेवुन गेला. त्याच वेळी शेजारीच असलेल्या विठ्ठल मंदिरातील दोन अनोळखी इसम हे त्या ठिकाणहुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. त्यावेळी पोलिस अंमलदार यांनी या घटनेची माहिती सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना दिली. त्यानंतर नवसरे तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी आले. कार घेऊन पळालेल्या इसमाचा पोलिस कर्मचारी सचिन दरेकर आणि सागर वाघमोडे यांनी पाटलाग करुन सातारा जिल्ह्यातील लोणंद येथुन ताब्यात घेतले. तसेच अंधाराचा फायदा घेवुन पळालेल्या इसमांना देखील येथील पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. यावेळी आरोपीकडुन गेल्या १०७ वर्षापुर्वीच्या पानेश्वराची मुर्ती, दोन मुकुट, दोन समई, एक पंचार्थी, मूषक, १५ लहान मोठ्या घंटा आदी माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.         या चोरांनी सुपे, भोर, वेल्हा, सातारा, वाठार आणि हडपसर आदी ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आदी पोलिस ठाण्यात गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्ह्याचे पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार, विभागिय पोलुस अधिकारी सुर्यदर्शन राठोड यांनी ही माहिती दिली. तसेच यातील पाटणे या आरोपीस २१ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर इतर दोघांना गुरुवारी ( दि. १९ ) कोर्टात हजर करण्यात आले असुन चौथा आरोपी विधीसंघर्ष बालक असुन त्यास नोटीस बजावण्यात आल्याचे सपोनी मनोजकुमार नवसरे यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीTempleमंदिरMONEYपैसाThiefचोर