शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राज्य महिला आयोगाचे नाव बदलून 'राष्ट्रवादी महिला आयोग' करा; तृप्ती देसाईंचा चाकणकरांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 12:16 PM

तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात उडी घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला

पुणे: पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते झाले होते. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्यानंतर काल वैशाली नागवडे आणि इतर महिलांना झालेल्या मारहाणीची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत. या दखलनंतर तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात उडी घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट केली आहे. 

देसाई म्हणाल्या, राज्य महिला आयोगाचे नाव बदलून "राष्ट्रवादी महिला आयोग" केले पाहिजे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा कारवाई करताना वारंवार भेदभाव करताना दिसत आहेत. असा निशाणा साधत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या कामावर टीका केली आहे.    

कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करा 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये एका कार्यकर्त्याने महिलेला मारहाण केल्याची बातमी समाजमाध्यमाद्वारे समजली.याप्रकरणी योग्य ती चौकशी करून मारहाण करणाऱ्या इसमावर त्वरित कारवाई करावी. तसेच केलेल्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत. असे ट्विट राज्य महिला आयोगाने केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेTrupti Desaiतृप्ती देसाईWomenमहिलाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा