Pune: मेट्रो भुयारी पादचारी मार्गाच्या कामामुळे कसबा पेठेतील वाहतूकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 13:13 IST2023-07-11T13:12:58+5:302023-07-11T13:13:17+5:30
साततोटी पोलिस चौकी ते बुधवार पेठ मेट्रो स्टेशनपर्यंत पादचारी भुयारी मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे...

Pune: मेट्रो भुयारी पादचारी मार्गाच्या कामामुळे कसबा पेठेतील वाहतूकीत बदल
पुणे : कसबा पेठेतील साततोटी पोलिस चौकी ते बुधवार पेठ मेट्रो स्टेशनपर्यंत पादचारी भुयारी मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे पवळे चौक ते कमला नेहरू चौक या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
पवळे चौक ते कमला नेहरु चौक (अगरवाल रोड) दरम्यान तीन चाकी, चारचाकी व जड वाहनांच्या वाहतुकीस तात्पुरती बंदी करण्यात येत आहे. पवळे चौकातून अगरवाल रोडने कमला नेहरु हॉस्पिटलकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पवळे चौकातून पुण्यश्वर रोडने कुंभारवेस चौक मार्गे कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय उजवीकडे वळून बाबुराव आव्हाड पथने इच्छितस्थळी जावे. पवळे चौकातून दगडी पाल रोडने माणिक चौक मार्गे फडके हौद चौक, गणेश रोडने इच्छितस्थळी जावे.
कमला नेहरू हाॅस्पिटल चौकातून अगरवाल रोडने पवळे चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी कमला नेहरू चौकातून डावीकडे वळून महाराणा प्रताप रोडने देवजीबाबा चौक, गणेश रोडने इच्छितस्थळी जावे. कमला नेहरू चौक उजवीकडे वळून बाबुराव आव्हाड पथमार्गे कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय, डावीकडे वळून कुंभारवेस मार्गे वीर संताजी घोरपडे रोडने इच्छितस्थळी जावे.