शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचोरांचे पोलिसांसमोर आव्हान

By admin | Updated: July 17, 2014 03:09 IST

मालमत्तेच्या गुन्ह्यांत मोडत असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत पुणे आणि पिंपरी -चिंचवडमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

लक्ष्मण मोरे, पुणेमालमत्तेच्या गुन्ह्यांत मोडत असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत पुणे आणि पिंपरी -चिंचवडमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दुर्दैवाने चोरीला गेलेल्या वाहनांच्या तपासाचे प्रमाण अगदी नगण्य आहे. गेल्या आठवड्यात फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये चोरीची मोटारसायकल वापरण्यात आल्यामुळे वाहनचोरीचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चोरीच्या वाहनांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ लागल्यामुळे पोलिसांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे. १० जुलैला दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी दगडूशेठ मंदिराच्या अगदी जवळ व पोलीस ठाण्याच्या आवारामध्येच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटासाठी जी मोटारसायकल वापरण्यात आली ती एका पोलीस कर्मचाऱ्याची असून, सातारा न्यायालयामधून चोरण्यात आली होती. यासोबतच १७ एप्रिल २०१३ रोजी बेंगळुरु शहरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्येही चोरीचीच मोटारसायकल वापरण्यात आली होती. चोरीची वाहने नंबर प्लेट न बदलता दहशतवादी कारवायांमध्ये वापरण्यात येत आहेत. काही उदाहरणांमधून हे स्पष्ट झाले आहे. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थी आणि १७ ते ३० या वयोगटातील तरुण वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक सहभागी असल्याचे पुणे पोलिसांकडील आकडेवारीवरून समोर आले आहे. पुण्यामध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. सोनसाखळी चोऱ्या, घरफोडी, लूटमार, वाटमारी अशा गुन्ह्यांसाठीही चोरीच्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. कधी कामाची निकड म्हणून, तर कधी हौसेने खरेदी केलेली वाहने चोरटे लीलया चोरून नेत आहेत. इतर कोणत्याही वाहनाच्या चोरीपेक्षा मोटारसायकल किंवा दुचाकी (मोपेड) चोरणे अधिक सोपे असल्यामुळे दुचाकी चोरीचे प्रमाण मोठे आहे. वाहने चोरणे, त्यांच्यामध्ये बदल करणे, नंबर प्लेट बदलणे अशा कामांमध्ये काही गॅरेजचालक, सोसायटीचे सुरक्षारक्षक सामील असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. गुन्हे शाखेकडून जरी वाहनचोरीचे काही गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असले; तरी ा ते प्रमाण खूपच कमी आहे. पोलिसांनी हस्तगत केलेली चोरीची वाहने नेण्यासाठी कधी कधी वाहनाचे मालकही समोर येत नाहीत. अनेकदा पकडलेल्या वाहनांमधील महत्त्वाचे पार्ट गायब असतात. ही वाहने नेऊनही फारसा फायदा होत नसल्यामुळे मालक वाहने घ्यायला फिरकतच नाहीत.