शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

चाकणच्या खराबवाडीतील कचरा पेटणार

By admin | Updated: October 5, 2015 01:54 IST

खराबवाडीच्या वाघजाईनगरजवळील दगड-खाणीतील कचरा डेपो त्वरित न हलवल्यास आमरण उपोषण करून तीव्र आंदोलनाचा इशारा वाघजाईनगर

चाकण : खराबवाडीच्या वाघजाईनगरजवळील दगड-खाणीतील कचरा डेपो त्वरित न हलवल्यास आमरण उपोषण करून तीव्र आंदोलनाचा इशारा वाघजाईनगर, बिरदवडीच्या ग्रामस्थांनी व पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या खराबवाडी येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी दिला आहे. ग्रामस्थ दररोज कचऱ्याच्या गाड्या अडवीत असूनही रात्री-अपरात्री तसेच दिवसाढवळ्या कचऱ्याच्या गाड्या बिनधास्तपणे खाली केल्या जात आहेत. हा कचरा डेपो त्वरित हलविला नाही तर खेड तहसील कार्यालयापुढे पुन्हा एकदा गावातील सर्व कुटुंबांतील आबालवृद्ध व महिलांसह उपोषण करण्याचा इशारा वाघजाईनगर ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच कचऱ्याच्या गाड्या पेटवून देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शिळवणे व वाघजाईनगर ग्रामस्थांनी दिला आहे. हा कचरा दररोज पेटवून देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषणही होत आहे. या कचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावून दगड-खाणीतील कचरा डेपो बंद करण्याची मागणी माजी उपसरपंच बाळासाहेब शिळवणे, ग्रा. पं. सदस्य रोहिदास शिळवणे, माजी सदस्य राहुल शेलार, रामदास शिळवणे, दत्तात्रय शिळवणे, तुकाराम शिळवणे, सचिन शिळवणे, दत्ता शिळवणे, सोपान शिळवणे, संतोष शिळवणे, भगवान गायकवाड, लक्ष्मण शेडगे व ग्रामस्थांनी केली आहे. यापूवीर्ही खराबवाडी ग्रामस्थ व हनुमान प्रासादिक भजनी मंडळाने दोन वर्षांपूर्वी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्या वेळी प्रांताधिकाऱ्यांनी हा कचरा डेपो हलविण्याचे आश्वासन दिले होते. हा डेपो चाकणची राक्षेवाडी येथील गायरान जागेत हलविण्यासाठी पाहणी करण्यात आली असून, त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)